Sanika Bhoite : पोरी तुझे नादानं फेम सानिका भोईटेने खरेदी केली ड्रीम कार (Video)

Sanika Bhoite
Sanika Bhoite
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्वत:ची कार असावी हे प्रत्येकाचंच स्वप्न असतं. आणि हेच स्वप्न जर करिअरच्या सुरूवातीस साकार होणं हे फार अवघड आहे. (Sanika Bhoite ) परंतु अभिनेत्री सानिका भोईटे हीने तीच्या मेहनतीच्या बळावर तब्बल २२ व्या वर्षी तीच्या आयुष्यातील पहिली कार खरेदी केली. सूत्रांच्यानुसार गेल्यावर्षी तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलेला, त्यात तिने आईला विचारलं..आई तुला यावर्षी माझ्याकडून कायं हवं. आईने सांगितलं. तू एक फोर व्हिलर खरेदी करं. आणि सानिकाने तिच्या आईचं स्वप्न त्याचवर्षाच्या अखेरीस पूर्ण केलं. (Sanika Bhoite )

संबंधित बातम्या – 

अभिनेत्री सानिका भोईटेने आजवर पोरी तुझे नादान, भन्नाट पोरगी, हुरपरी, रूप साजरं, तुझी माझी यारी, साज तुझा अश्या अनेक मराठी गाण्यांमध्ये अभिनय केला आहे. तीच्या सर्वच गाण्यांचे व्ह्यूज हे मिलीयन पार गेले आहेत. सध्या तीचे इंस्टाग्रामवर १ मिलियन फोलोअर्स आहेत. तर तिच्या युट्यूब चॅनेलवर २०० हजार सबस्क्रायबर्स आहेत. सोशल मीडियावर तीचा फार मोठा चाहतावर्ग देखिल आहे.

अभिनेत्री सानिका भोईटे तीच्या करिअरविषयी सांगते, "मी साता-यातील फलटण या गावातून पुणे येथे शिक्षणासाठी एकटीच आले. पुण्यात मी सावित्रीबाई फुले विद्यापीठातून २०२२ मध्ये बॅचलर इन बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशनचं माझं पदवी शिक्षण पूर्ण केलं. आणि आता मी पुण्यातचं राहते. माझं शिक्षण सुरू असताना, मला ग्लॅमरस बॉलीवूड जगाची भुरळ पडली. मी वयाच्या १८ व्या वर्षापासून इन्स्टाग्रामद्वारे तब्बल २२ पेक्षा जास्त मोठ्या ब्युटी ब्रॅंडसोबत कामे केली. शिवाय मी अनेक मराठी म्युझिक अल्बममध्ये देखिल काम केले.

त्यात सोशल मीडिया हे असं माध्यमं आहे जिथे आपण आपल्यातील टॅलेंट लोकांपर्यंत सहज पोहोचवू शकतो. हा प्रवास सोप्पा नव्हता. परंतु मी कायम प्रामाणिक प्रयत्न करेन. भविष्यात संधी मिळाल्यास मला वेब सिरीजमध्ये काम करायला नक्की आवडेल."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news