New Year Sankalp : नव्या वर्षात कलाकारांनी कोणते संकल्प केले जाणून घ्या | पुढारी

New Year Sankalp : नव्या वर्षात कलाकारांनी कोणते संकल्प केले जाणून घ्या

पुढारी ऑनलाईन डेस्क : नवीन वर्षामध्ये अनेक कलाकारांनीही २०२४ साठी काही संकल्प केले आहेत. ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ नेत्रा म्हणजे तितिक्षा तावडेने सांगितले, ” मी २०२४ साठी हा संकल्प केले आहे की मी चित्रकला, नवीन अनोळखी आणि वेगळी ठिकाणे शोधून त्या जागा फिरणे. अशा छोट्या- छोट्या गोष्टी ज्या मला आनंद देतात, त्या गोष्टींना मी वेळ देणार आहे. माझ्या युट्यूब चॅनलचेवर खूप प्रगती करेन. कारण मला माझ्या चॅनेलसाठी व्हिडिओ बनवायला खूप मज्जा येत आहे. नवीन गोष्टी वाचून आणि बघून अभिनय कौशल्यामध्ये सुधारणा करणार. ताण न ठेवता त्याऐवजी सातत्यपूर्ण व्यायाम करून, योग्य आहार घेऊन तंदुरुस्त राहण्यावर लक्ष केंद्रित करणार मी २०२४ मध्ये.

संबंधित बातम्या –

सर्वांची लाडकी अक्षरा म्हणजेच ‘तुला शिकवीन चांगलाच धडाची’ शिवानी रांगोळेने २०२४ चा संकल्प करताना सांगितले की, “मी नवीन वर्षामध्ये ध्यान हे माझ्या रोजच्या दिनचर्येत नक्की असेल. मी कुटुंबावर अधिक लक्ष केंद्रित करेन. कारण त्यांच्यासोबत वेळ घालवणे माझ्यासाठी खूप आनंददायी ठरते. यावर्षी शूटिंगच्या गडबडीत या दोन गोष्टींवर २०२३ मध्ये खूप दुर्लक्ष झाले आहे.

‘अप्पी आमची कलेक्टरचा’ अर्जुन म्हणजे रोहित परशुरामने सांगितले, ‘आपलं काम प्रामाणिकपणे करत राहायचं हे तर आहेच. पण एक गुप्त संकल्प आहे, जे सध्या फक्त मलाच माहिती आहे. काही महिन्यातच ते संकल्प पूर्ण होईल आणि महाराष्ट्रा समोर माझं ते गुपित प्रेक्षकांच्या समोर येईल. २०२४ मध्ये उत्तम काम आणि आरोग्याची काळजी घेईन.

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ इंद्राणी म्हणजे श्वेता मेहेंदळेने सांगितले’ “दरवर्षी मी एक संकल्प करते की, आठवड्याला एक पुस्तक म्हणजेच वर्षाला ५२ पुस्तक वाचून झालीच पाहिजे. हा संकल्प मी अनेक वर्ष पासून धरतेय पण अजून परेंत तो पूर्ण झालेला नाही म्हणून २०२४ मध्ये ५२ पुस्तक वाचून पूर्ण करायचा संकल्प मी पूर्ण करणार आहे. दुसरा संकल्प आहे की, २०२३ मध्ये कोकण आणि गोवा अशा राईड्स केल्या होत्या. तर २०२४ मध्ये लांबची राईड कराची आहे. फक्त ‘सातव्या मुलीची सातवी मुलगीच्या’ शूटिंगमधून वेळ कसा काढायचा याचं नियोजन मला करायचं आहे. तर हे दोन मोठे संकल्प आहेत २०२४ मध्ये.

‘सारं काही तिच्यासाठी’ मधली निशिगंधा खोत म्हणजे दक्षता जोइलने सांगितले, “शूटिंग मध्ये व्यस्त असताना खूप छान चित्रपट आणि वेब सीरिज बघणं राहून जातात. दुसऱ्या कलाकारांचे छान काम बघून खूप शिकायला ही मिळतं आणि मला चित्रपट आणि वेब सीरिज पाहायला ही आवडत. तर मी निश्चय करीन स्वतःशी कि २०२४ मध्ये जितके जास्त सिनेमे पाहायला मिळतील तितके अगदी वेळ काढून बघेन.”

२०२४ मध्ये तुम्हीही उत्तम संकल्प करा आणि एक संकल्प हाही करा कि जे संकल्प केले आहेत ते यथार्थपणे पूर्ण करा. नवीन वर्षाचे त प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा!

Back to top button