Salaar : प्रभासच्या ‘सालार’चा मध्यरात्रीपासून शो; तेलंगणा सरकारची परवानगी | पुढारी

Salaar : प्रभासच्या 'सालार'चा मध्यरात्रीपासून शो; तेलंगणा सरकारची परवानगी

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ अभिनेता प्रभासचा बहुचर्चित ‘सालार’ ( Salaar ) हा चित्रपट यंदाच्या ख्रिसमसच्या मुहूर्तावर म्हणजे, २२ डिसेंबर २०२३ रोजी रिलीज होणार आहे. या सध्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरूवात झाली असून चित्रपटाने १२. ४२ कोटींच्या भरघोस अशी कमाई केली आहे. याशिवाय हा चित्रपट बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानच्या ‘डंकी’ चित्रपटाला टक्कर देणार आहे. आता ‘सालार’ चित्रपटाबद्दल एक नवी अपडेटस् समोर आली असून आता चाहत्यांच्या आनंद दुगुणित होणार आहे. मध्यरात्री एक वाजल्यापासून ते पहाटे चार वाजेपर्यत शो दाखवणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मिडनाइट शोचे खूपच बुकिंग होत आहे.

संबंधित बातम्या 

रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, प्रभासचा बहुचर्चित ‘सालार’ ( Salaar ) हा चित्रपट २२ डिसेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटाचे शो मध्यरात्री १ ते ४ या वेळेत सुरू करण्यास तेलंगणा सरकाने परवानगी दिली आहे. यामुळे प्रभासच्या चाहत्यांना आता त्याचा हा चित्रपट मध्यरात्री सुद्धा पाहता येणार आहे.

दरम्यान सरकारची परवानगी मिळाल्यानंतर मिडनाईट शोसाठी मोठ्या प्रमाणात बुकिंग होत आहे. शोचं तिकीट खरेदी करण्यासाठी चाहत्यांनी लांबच- लांब रांगा लावल्या आहेत. अॅडव्हान्स बुकिंगमध्ये ‘सालार’ ने भरघोस अशी कामगिरी करत आतापर्यंत १२.४१ कोटी रुपयांची तिकिटे विकली गेली आहेत.

आगामी ‘सालार’ हा चित्रपट दोन मित्रांच्या कथेवर आधारित आहे. यात प्रभाससोबत अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन देखील दिसणार आहे. दोन्ही स्टार्स मित्रांच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केलं आहे. हा चित्रपट तेलुगूसोबत कन्नड, हिंदी, तमिळ आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

‘सालार’ बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या ‘डंकी’ चित्रपटाला टक्कर देणार आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘डंकी’ मध्ये शाहरुख खानसोबत बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू, विकी कौशल यांनी भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट २१ डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Back to top button