पुढारी ऑनलाईन डेस्क : चित्रपट 'पुष्पा'मध्ये अल्लू अर्जुनचा मित्र केशवची भूमिका साकारणाऱ्या जगदीशने आपला गुन्हा कबूल केला आहे. जगदीशला ६ डिसेंबर रोजी महिला ज्युनिअर आर्टिस्टला जीवन संपवण्यासाठी प्रवृत्त केलं होतं. त्यानंतर अभिनेत्याने आपला गुन्हा कबूल केला. पुष्पा अभिनेता जगदीशने सांगितलं की, ज्या महिलेने ब्लॅकमेलिंगला कंटाळून आपले जीवन संपवले होते, ती आणि स्वत:जगदीश पाच वर्षांपासून एकत्र होते.
संबंधित बातम्या –
रिपोर्ट्सनुसार, जगदीशने महिला जुनियर आर्टिस्टचे पर्सनल फोटो काढून तिला ब्लॅकमेल केल्याचं कबूल केलं. २९ नोव्हेंबर रोजी जुनियर आर्टिस्टने गळफास घेऊन जीवन संपवले होते. त्यानंतर त्याच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती.
तपासात समोर आले होते की, जगदीशने अभिनेत्रीला ब्लॅकमेल केलं होतं आणि पर्सनल फोटो इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी देत होता. अखेर ब्लॅकमेलिंगला कंटाळून तिने जीवन संपवले होते. याप्रकरणी ॲक्शन घेत पोलिसांनी ६ डिसेंबर रोजी जगदीशला अटक केली होती.
जगदीशचं म्हणणं आहे की, तो त्या जुनिअर अभिनेत्रीसोबत पाच वर्षे रिलेशनशीपमध्ये होता. पण, पुष्पाच्या यशानंतर दोघे वेगळे जाले होते. परंतु, तिला दुसऱ्या पुरुषासोबत पाहणं, कठीण होतं. या कारणामुळेचे त्याने हे पाऊल उचलंल, पण तिने आपले जीवन संपवले.