Chris Gayle : Dunki च्या लुट पुट गया गाण्यावर क्रिस गेलचे थिरकले पाय | पुढारी

Chris Gayle : Dunki च्या लुट पुट गया गाण्यावर क्रिस गेलचे थिरकले पाय

पुढारी ऑनलाईन डेस्क : शाहरुख खान (Shah Rukh Khan) चा चित्रपट डंकीतील गाणे लुट पुट गयावर क्रिकेटर क्रिस गेल(Chris Gayle) डान्स करताना दिसला. त्यानंतर किंग खान शाहरुखने प्रतिक्रियाही दिली. शाहरुख खानचा चित्रपट डंकी (Dunki) पुढील काही दिवसात चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. त्यामुळे शाहरुख खूप चर्चेत आहे. या चित्रपटातील लुट पुट गाण्यावर क्रिकेटर क्रिस गेल(Chris Gayle) देखील थिरकताना दिसत आहे.

संबंधित बातम्या –

शाहरुख खानने आपल्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवर फॅन्स पेजचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये क्रिकेटर क्रिस गेल डंकीच्या गाण्यावर लुट पुटवर डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये स्टार जमैका क्रिकेटर शाहरुखचे स्टेप्सना परफेक्टली कॉपी करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर देखील शाहरुख खानने आनंदित होऊन प्रतिक्रिया दिलीय.

शाहरुखने केले क्रिस गेलचे कौतुक

शाहरुखने हा व्हिडिओ शेअर करत गेलच्या डान्सिंग स्टेप्सचे कौतुक केले आणि लिहिलं- युनिव्हर्सच्या बॉसने याला पार्कच्या बाहेर हिट केलं.  केवळ हे करू शकतात. धन्यवाद माय मॅन, क्रिस गेल, आपण भेटुया आणि करुया लुट पुट गयावर डान्स लवकरच, हा हा.

या दिवशी रिलीज होणार चित्रपट

शाहरुख खानच्या डंकीचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले आहे. राजकुमार आणि किंग खान पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. शाहरुखने याआधी राजकुमार यांचे हिट चित्रपट मुन्ना भाई, ३ इडियट्स देखील रिजेक्ट केले आहेत. सोबतच डंकीमध्ये तापसी पन्नू, विक्की कौशल, बोमन ईरानी आणि विक्रम कोचर दिसणार आहेत. हा चित्रपट २२ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. याचदिवशी प्रभासचा सालारदेखील भेटीला येणार आहे.

Back to top button