Kannada actress Leelavathi : कन्नड अभिनेत्री लीलावती यांचे निधन, ६०० चित्रपटांत साकारल्या होत्या भूमिका

Kannada actress Leelavathi
Kannada actress Leelavathi

पुढारी ऑनलाईन डेस्क : ज्येष्ठ कन्नड अभिनेत्री लीलावती यांचे आज (८ डिसेंबर) वृद्धापकाळातील आजारपणामुळे निधन झाले. (Kannada actress Leelavathi ) त्या ८५ वर्षांच्या होत्या. त्यांनी डॉ. राजकुमार यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये सहकलाकार म्हणून ६०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. लीलावती यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत श्रद्धांजली वाहिली आहे. (Kannada actress Leelavathi )

दरम्यान, कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरमैय्या यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर फोटो ट्विट करत दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय- ज्येष्ठ कन्नड चित्रपट अभिनेत्री लीलावती यांच्या निधनाची बातमी वेदनादायक आहे. मागच्याच आठवड्यात त्यांच्या आजारपणाची बातमी कळल्यानंतर मी त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यांचा मुलगा विनोद राज यांच्याशी बोललो. अनेक दशके आपल्या मंत्रमुग्ध अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या लीलावती पुन्हा बरी होऊन आपल्यासोबत अधिक काळ राहतील हा माझा विश्वास खोटा आहे. मृतांच्या आत्म्याला शांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो अशी मी प्रार्थना करतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news