Junior Mehmood Death : प्रसिद्ध अभिनेते ज्युनियर मेहमूद यांचे कर्करोगामुळे निधन | पुढारी

Junior Mehmood Death : प्रसिद्ध अभिनेते ज्युनियर मेहमूद यांचे कर्करोगामुळे निधन

पुढारी ऑनलाईन डेस्क : सिने कलाकार ज्युनियर मेहमूद यांचे निधन. पोटाच्या कर्करोगामुळे वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. पोटाच्या कॅन्सर मुळे त्यांच्यावर टाटा रुग्णालयात गेल्या काही दिवसापासून उपचार सुरू होते मध्यरात्री २ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (Junior Mehmood Death) त्यांच्या पश्चात  पत्नी, दोन मुलं, सुना आणि एक नातू असा परिवार आहे.

माहितीनुसर, प्रसिद्ध अभिनेते ज्युनियर मेहमूद हे पोटाच्या कर्करोग झाला होता. पोटाचा कर्करोग चौथ्या टप्प्यात पोहोचला होता. त्यांच्यावर परळ येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. अखेर वयाच्या ६७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. जुहू येथील कब्रस्तानात ज्युनिअर मेहमुद यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.

यांनी दिले होते नाव ‘ज्युनियर मेहमुद’

ज्युनियर मेहमुद यांच मुळ नाव नईम सय्यद हे होते. त्यांना ‘ज्युनियर मेहमुद’ हे नाव त्यांना मेहमुद अली होते. ज्युनियर मेहमूद यांनी ‘हाथी मेरे साथी’, ‘कारवां’ आणि ‘मेरा नाम जोकर’सह अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. अभिनयातील कारकिर्द पाहता त्यांनी अतापर्यंत २६५ चित्रपटांमध्ये अभिनय केले आहे. तर ६ मराठी चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं आहे.

हेही वाचा 

Back to top button