Urfi Javed Instagram : उर्फी जावेदचं इन्स्टाग्राम अकाउंट बंद; नंतर असं घडलं की… | पुढारी

Urfi Javed Instagram : उर्फी जावेदचं इन्स्टाग्राम अकाउंट बंद; नंतर असं घडलं की...

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस फेम अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या अंतरंगी फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. उर्फी सतत तिच्या इन्स्टाग्रामवर अनेक बोल्ड व्हिडिओ आणि फोटो शेअर करून चाहत्याच्या संपर्कात राहत असते. मात्र, आता उर्फीचं इंन्स्टाग्राम अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं आहे. याबद्दलची माहिती देताना उर्फीने स्वत: इन्स्टाग्राम अकाउंटचा ( Urfi Javed Instagram ) स्क्रीनशॉट शेअर केला आहे.

संबंधित बातम्या 

सोशल मीडियावर शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये उर्फी जावेदने तिचे इन्स्टाग्राम अकाउंट सस्पेंड करण्यात आल्याची माहिती दिली आहे. त्यात उर्फीच्या चुकिच्या पद्धतीने वागत असून समुदाय मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जात नसल्याचे म्हटलं आहे. यात स्पष्टपणे तिने तिचे चुकिचे बोल्ड व्हिडिओ शेअर करत असल्याचेही म्हटलं आहे.

दरम्यान, काही वेळानंतर उर्फी जावेदचे इंस्टाग्राम अकाउंट तिच्या टीमने अॅक्टिव्ह करत पुन्हा चालू केलं आहे. इतकेच नाही तर इन्स्टाग्राम टीमने उर्फीची माफीही मागितली आहे. कारण त्याच्याकडून अकाउंट चुकून बंद झाल्याची माहिती त्यांनी त्यात सांगितली आहे. या घटनेचा एक स्क्रीनशॉटही उर्फीने नंतर शेअर केला आहे. यावरून उर्फीचे काही वेळासाठी चुकून इन्स्टाग्राम बंद झाल्याची माहिती समोर आली आहे.

उर्फी तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असल्याने तिला वारंवार जीवे मारण्याची धमक्या मिळत होत्या. दरम्यान काही नेटकऱ्यांनी तिला सोशल मीडियाचे अकाऊंट डिलीट करण्याचा सल्लाही दिला होता. मात्र, ती कोणालाही न जुमानता बोल्ड व्हिडिओ शेअर करत असते. यामुळे कधी-कधी तिला जोरदार ट्रोलिंगचा सामनाही करावा लागला होता. ( Urfi Javed Instagram )

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

Back to top button