Bhool Bhulaiyaa 3 : कार्तिक आर्यन पुन्हा बनणार 'रूह बाबा'; तब्बूचा पत्ता कट | पुढारी

Bhool Bhulaiyaa 3 : कार्तिक आर्यन पुन्हा बनणार 'रूह बाबा'; तब्बूचा पत्ता कट

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘भूल भुलैया’ या चित्रपटाच्या पहिल्या भागात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, अभिनेत्री विद्या बालन, शायनी आहुजा आणि अमिषा पटेल यांनी दर्जेदार अभियन साकारला. हॉरर-कॉमेडी ‘भूल भुलैया’ च्या दुसऱ्या सीक्वलमध्ये अभिनेता कार्तिक आर्यन, कियारा आडवाणी आणि तब्बूच्या कामगिरीने बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट २६५ कोटी रुपयांच्या घरात पोहोचला. यानंतर निर्मात्यांनी याच चित्रपटाचा तिसरा सीक्वल घेवून येण्याची घोषणा केली. मात्र, यातील कलाकारांनी नावाची घोषणा केलेली नव्हती. आता मात्र, या चित्रपटाच्या बाबतीत नविन अपडेट समोर आली आहे. ‘भूल भुलैया ३’ ( Bhool Bhulaiyaa 3 ) मध्ये कार्तिक आर्यनची वर्णी लागली असल्याची आणि अभिनेत्री तब्बूचा पत्ता कट झाल्याची चर्चा रंगू लागली आहे.

संबंधित बातम्या 

मिळालेल्या माहितीनुसार, आता निर्मात्यांनी ‘भूल भुलैया ३’ ची जोरदार तयारी सुरू केली आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत असून ‘रूह बाबा’ ची भूमिका साकारणार आहे. मात्र, अभिनेत्री तब्बू या चित्रपटातून बाहेर पडल्याचे बोलले जात आहे. यावरून कार्तिक पुन्हा ‘रूह बाबा’ बनणार असल्याने चाहत्याचा आनंद द्विगुणीत झाला आहे. मात्र, तब्बू या चित्रपटात दिसणार आहे की नाही? यांची अद्याप माहिती मिळालेली नाही.

दरम्यान मोठ्या मानधनाची ऑफऱ असूनही तब्बू तिची भूमिका करण्यास उत्सुक नसल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे चित्रपटाची स्क्रिप्ट फायनल झाल्यानंतर इतर कलाकारांची नावाची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती निर्मात्यांनी दिलेली आहे. यामुळे अजून काही कलाकारांची नावे गुलदस्तात आहेत. अनीस बज्मी यांनी दिग्दर्शित २०२२ मध्ये रिलीज झालेल्या ‘भूल भुलैया २’ ने मोठे यश मिळवले होते.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, कार्तिक आर्यन शेवटचा ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपटात दिसला होता. तर तो कबीर खानच्या जीवनावर आधारित ‘चंदू चॅम्पियन’ मध्ये दिसणार आहे. अभिनेत्री तब्बू शेवटची विशाल भारद्वाजच्या स्पाय थ्रिलर ‘खुफिया’ मध्ये दिसली होती. यानंतर ती अजय देवगणसोबत ‘और में कहाँ दम था’ आणि करीना कपूर खान आणि क्रिती सेननसोबत ‘द क्रू’ मध्ये दिसणार आहे.

Back to top button