IFFI 2023 : ‘एंडलेस समर सिंड्रोम’ हा चित्रपट प्रेक्षकांनी अनुभवावा : लिंडसे टेलर स्टुअर्ट | पुढारी

IFFI 2023 : 'एंडलेस समर सिंड्रोम' हा चित्रपट प्रेक्षकांनी अनुभवावा : लिंडसे टेलर स्टुअर्ट

पणजी : प्रभाकर धुरी : ‘एंडलेस समर सिंड्रोम’ चित्रपटाचे कलाकार आणि इतर टिमने आज मंगळवारी (दि. २८) रोजी गोव्यात ५४ व्या इफ्फीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधला. चेक प्रजासत्ताकमधील फ्रेंच भाषिक चित्रपटाचा मंगळवारी रोजी इफ्फीमध्ये आशियाई प्रीमियर झाला. ( IFFI 2023 )

संबंधित बातम्या 

यावेळी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सहाय्यक निर्माती लिंडसे टेलर स्टुअर्ट म्हणाल्या की, “हा चित्रपट फ्रेंच सिनेमाला आदरांजली आहे. दिग्दर्शक कावेह दानेशमंद यांचा संदेश देताना त्या म्हणाल्या की, या चित्रपटावर लेखक किंवा दिग्दर्शकाने आपली प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रेक्षकांनी चित्रपट अनुभवावा अशी दिग्दर्शकाची इच्छा आहे.

चित्रपटाच्या निर्मितीतील आव्हानांबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, हा चित्रपट कोविड महामारीच्या काळात आंतरराष्ट्रीय कलाकार आणि तंत्रज्ञांनी तयार केला होता. एका महिला कुटुंब प्रमुखांवर केंद्रित कथानकाने मी प्रभावित झाले होते.

हा चित्रपट एक वकील आणि दोन मुलांच्या आईची कथा आहे, ज्यांचे फ्रान्समधील सुखी कौटुंबिक जीवन तिच्या पतीच्या निष्ठेबद्दल अनिष्ट दूरध्वनी आल्यानंतर कोलमडून पडते. जो कौटुंबिक बंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा हा चित्रपट आहे. आणि कौटुंबिक नाट्यशैलीत गुंतागुंत आणि बारकावे दर्शवतो. असेही त्यांनी म्हटले आहे. ( IFFI 2023 )

Back to top button