तुला शिकवीन चांगलाच धडा : अक्षरा आणि भुवनेश्वरी आमने सामने

तुला शिकवीन चांगलाच धडा
तुला शिकवीन चांगलाच धडा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : झी मराठी वरील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेचा प्रेक्षकांमध्ये बराच बोलबोला सुरु आहे. प्रत्येक आठवड्यात ही मालिका काही ना काही नवीन वळण घेत असते. या मालिकेत भुवनेश्वरी आणि अक्षराचे नाते टप्या टप्यावर नवीन ट्विस्ट घेऊन येत आहे. त्याच कारण अक्षराच्या शाळेचा विषय असो किंवा अधिपतीचा अभ्यास.

संबंधित बातम्या –

नुकतंच 'सारं काही तिच्यासाठी' आणि 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या दोन मालिकांचे महासंगम विशेष भाग पार पडले. त्यात भुवनेश्वरी कोकणात अधिपतीला जमिनीच्या व्यवहारसाठी पाठवते पण भुवनेश्वरीला हे माहिती नाही की हा व्यवहार तिला एका मोठ्या संकटात टाकणार आहे.

अक्षराची भेट रघुनाथरावांशी होते आणि रघुनाथकाकांच्या मदतीने ती चारुहाससरांवर म्हणजेच अधिपतीच्या वडिलांवर आयुर्वेदिक औषधी उपचार सुरु करते आणि तेही भुवनेश्वरी मॅडमच्या नकळत. चारुहास सरांवर उपचार सुरु असताना अक्षराला एक मोठ गुपित कळतं आणि अक्षरा त्याचा शोध घेण्याचं ठरवते. अक्षराच्या आयुष्यात एकीकडे भुवनेश्वरीपासून लपवून अधिपतीची शिकवणी घेणे आणि दुसरीकडे चारुहास सरांवर कोण व्यक्ती आहे जी चुकीचा उपचार करत होते. या गोष्टीचा शोध घेणे या दोन गोष्टीचा ध्यास आहे.
पण काय होईल जेव्हा भुवनेश्वरीला कळेल अक्षराच्या या गोष्टीबद्दल? कशी सामोरी जाईल अक्षरा भुवनेश्वरीला? अधिपती आईला सोडून अक्षराची साथ देईल? या सर्व प्रश्नांची उत्तरे मालिकेत पाहायला मिळतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news