सा रे ग म प लिटिल चॅम्प्स टॉप-६ स्पर्धकांमध्ये रंगणार महाअंतिम सोहळा

vaishali madhe
vaishali madhe

पुढारी ऑनलाईन डेस्क : झी मराठीचा 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' हा कार्यक्रम आपल्या अंतिम टप्प्यावर पोहोचला आहे. प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे की कोण असणार 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्सच्या' ह्या पर्वाचा विजेता. एकापेक्षा एक धुरंदर छोटे स्पर्धक असल्यामुळे महाअंतिम सामना खूप रोमांचक असणार हे नक्की. मुंबईची श्रावणी वागळे, गोव्याचा हृषिकेश ढवळीकर, जयेश खरे, छोटा पॅकेट मोठा धमाका देवांश भाटे, गीत बागडे आणि कोपरगावची गौरी अलका पगारे या ६ स्पर्धकांमध्ये हा महाअंतिम सोहळा रंगणार आहे.

संबंधित बातम्या –

या पर्वाचं वैशिष्ट्य म्हणजे गुरुकुल, संपूर्ण पर्व हे स्पर्धक या गुरुकुलात रियाज करत होते आणि त्यांना मार्गदर्शन करत होते 'सलील कुलकर्णी' आणि 'वैशाली माढे'. काय असेल निकाल या महाअंतिम सोहळ्याचा? कोणाला मिळणार 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्सची ट्रॉफी यासाठी २५ नोव्हेंबरला महाअंतिम सोहळा रंगणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news