Tiger 3 : कॅटरिना कैफ-सलमान खानचे नवे गाणे ‘रुआन’ चर्चेत (Video) | पुढारी

Tiger 3 : कॅटरिना कैफ-सलमान खानचे नवे गाणे 'रुआन' चर्चेत (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : सिनेमॅटिक विश्वात सध्या चर्चा होतेय ती म्हणजे कॅटरिना कैफ आणि सलमान खान यांच्या टायगर 3 (Tiger 3) मधील रोमँटिक गाणं “रुआन” याची. सलमान खान सोबत तिच्या मंत्रमुग्ध केमिस्ट्रीने केवळ प्रेक्षकांना मोहित केलं नाही तर ती बॉक्स ऑफिसवर तिचे वर्चस्व देखील मजबूत करत आहे. ब्लॉकबस्टर चित्रपट टायगर 3 ने 100 कोटी कमवून सुपरहिट ठरला आहे. 12 नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या खास निमित्ताने ‘टायगर 3’ रिलीज झाला आहे. ओपनिंग डे पासूनचं तिकिट खिडकीवर या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आहे. सलमान खान, कॅटरीना कैफ आणि इमरान हाशमी मुख्य भूमिकेत आहेत. दरम्यान, या चित्रपटातील नवं गाणं ‘रुआन’ जारी करण्यात आलं आहे. या गाण्याला अरिजीत सिंहने आपला जादुई आवाज दिला आहे. (Tiger 3) गाण्याचे बोल इरशाद कामिलने लिहिले आहेत.

संबंधित बातम्या –

तिच्या मनमोहक अभिनयासाठी आणि जबरदस्त स्क्रीन प्रेझेन्ससाठी ओळखली जाणारी ही अभिनेत्री इंडस्ट्रीमध्ये सर्वात पुढे आहे. “रुआन” च्या रिलीजने टायगर 3 मध्ये अजून एक कमाल गाण्याची भर केली आहे आणि सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांची केमेस्ट्री पुन्हा एकदा प्रेक्षकांनी अनुभवली.

कॅटरिना कैफच्या टायगर 3 ने 100 कोटी चा गल्ला जमवत ” रुआन” या गाण्याने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मनीष शर्मा दिग्दर्शित आणि कॅटरिना कैफ आणि इमरान हाश्मी सोबत मुख्य भूमिकेत असलेला टायगर 3 12 नोव्हेंबर रोजी रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला. आता चाहते विजय सेतुपतीसोबत श्रीराम राघवनच्या “मेरी ख्रिसमस” मध्ये कतरिनाला बघण्यासाठी पुन्हा एकदा उत्सुक झाले आहेत.

Back to top button