Sunny Leone : सनीने दिली वाराणसीला भेट, केली गंगा आरती (Video)
पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री सनी लिओनी सध्या गायक अभिषेक सिंगसह तिच्या अलीकडील डान्स व्हिडिओच्या प्रमोशनसाठी अनेक ठिकाणी फिरत असताना सनी चक्क वाराणसीला जाऊन पोहोचली आहे. वाराणसीसारख्या धार्मिक शहराला तिने भेट दिली आणि सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. (Sunny Leone) केनेडी अभिनेत्रीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आणि ती या दौऱ्यादरम्यान सुंदर दिसत होती. (Sunny Leone)
संबंधित बातम्या-
गुलाबी सलवार सूटमध्ये ती अगदीच पारंपरिक भारतीय पोषाखात सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. गंगा आरतीचा अध्यात्मिक मूड तिच्या पोशाखाच्या चमकदार रंगाने रंगून गेला होता. पवित्र नदीच्या काठावरील धार्मिक समारंभात सनीच्या उपस्थितीने सगळ्यांना मोहित केलं.
नी ने हा सगळा अनुभव तिच्या सोशल मीडिया वर शेयर केला आहे आणि त्याला साजेसे कॅप्शन दिलं आहे "वाराणसीमधील गंगा आरती पाहण्याचा सर्वात आश्चर्यकारक अनुभव. धन्यवाद!! @abhishek_as_it_is & @tseries.official"
गंगा आरतीमध्ये परंपरांसोबत आधुनिकतेचे मिश्रण केल्याबद्दल चाहत्यांनी सनी लिओनीचे कौतुक केले. व्यावसायिक आघाडीवर सनी 'ग्लॅम फेम' वर जज म्हणून पदार्पण करण्याच्या तयारीत आहे जो लवकरच जिओ सिनेमावर प्रीमियर होणार आहे. अनुराग कश्यपचा निओ-नॉयर थ्रिलर 'केनेडी सोबतीला राहुल भट्ट अभिनीत, आणि तिचे तमिळ पदार्पण असलेला 'कोटेशन गँग ' हा चित्रपट येत आहे.

