Madame Web : ‘मॅडम वेब’ चा धमाकेदार ट्रेलर; डकोटाच्या ॲक्शन सीनचा धुमाकूळ (video)

Madame Web
Madame Web
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : हॉलिवूड अभिनेत्री डकोटा जॉनसन हिच्या आगामी 'मॅडम वेब' ( Madame Web ) चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान हा चित्रपट लवकरच त्याच्या भेटीस येत असल्याची माहिती समोर आली आहे. नुकताच चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर चाहत्याच्या भेटीस आला आहे. हा ट्रेलर पाहून चाहत्यांना चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ट्रेलरच्या व्हिडिओवर युजर्सनी कॉमेन्टसचा पाऊस पाडलाय.

संबंधित बातम्या

अभिनेत्री डकोटा जॉनसन हिने तिच्या इन्स्टाग्रामवर आगामी 'मॅडम वेब' ( Madame Web ) चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात डकोटा जॉनसनने कॅसँड्रा वेब (मॅडम वेब) आणि अमेरिकन अभिनेत्री सिडनी स्वीनी ज्युलियाने 'कारपेंटर'च्या भूमिका साकारली आहे. या धमाकेदार ट्रेलरमध्ये पहिल्यांदा स्पायरड मॅनकडून डकोटावर हल्ला केल्याचे दाखविले आहे. यातून ती सुटते. मात्र, ती हार न मानता जिंकण्याची जिद्द वाढते आणि ती ॲमेझॉनच्या जंगलात याबबातची काय माहिती मिळतेय यासाठी ती प्रयत्न करते. दरम्यानच तिच्यावर एका ट्रेनमध्ये स्पायडर मॅनकडून माणसाच्या वेशभूषेत येवून हल्ला केल्याचेही दाखविले आहे.

चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांना खूप आवडला आहे. यूट्यूबवर ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अल्पावधीतच सहा लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर त्याला ३२ हजारहून अधिकांनी लाईक्स केले आहेत. सोशल मीडियावर कॉमेंट करताना एका यूजर्सने लिहिले आहे की, 'ट्रेलरमधील संवाद खूपच चांगले आहेत.' 'मला मॅडम वेब यांचा अभिनय आवडला.', या चित्रपटासाठी आता प्रतीक्षा करू शकत नाही.'

'मॅडम वेब' हा चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजे, फेब्रुवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. एसजे क्लार्कसन दिग्दर्शित, या चित्रपटात एम्मा रॉबर्ट्स, सेलेस्टे ओ कॉनर, इसाबेला मर्सिड, तहर रहीम, अॅडम स्कॉट, जोशिया मामेट आणि माईक एप्स यांच्याही भूमिका आहेत. पटकथा बर्क शार्पलेस आणि मॅट स्झामा यांनी लिहिली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news