Nana Patekar : नाना पाटेकर यांनी सेल्फी घेण्यासाठी गेलेल्या ‘त्या’ तरुणाला मारले डोक्यात (Viral Video) | पुढारी

Nana Patekar : नाना पाटेकर यांनी सेल्फी घेण्यासाठी गेलेल्या 'त्या' तरुणाला मारले डोक्यात (Viral Video)

वाराणसी : पुढारी ऑनलाईन डेस्क – वाराणसीमध्ये चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेते नाना पाटेकर यांनी एका तरुणाला मारले. (Nana Patekar) हा तरुण पाटेकर यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी पोहोचला. तेव्हा तरुणाला त्यांनी थप्पड लगावली. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. चित्रपट ‘जर्नी’चे शूटिंग सुरु असताना हा तरुण सेल्फी घेण्यासाठी पोहोचला होता. (Nana Patekar)

व्हिडिओमध्ये नाना पाटेकर हे रागात असलेले दिसताहेत. तरुणाला जोरात डोक्यात मारल्यानंतर हा प्रकार कॅमेरात कैद झाला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

दरम्यान, त्याचवेळी युनिटमधील एक सदस्य त्या तरुणाची मान धरून त्याला बाजूला घेऊन जातो. हा प्रकारदेखील व्हिडिओमध्ये कैद झाला. यानंतर नाना पाटेकर यांना नेटकऱ्यांकडून ट्रोल केलं जात आहे. कंट्रोल उदय कंट्रोल हा डायलॉग लिहून अनेक नेटकी ट्विट करत आहेत.

video – Thriller Soundtrack Music x वरून साभार

Back to top button