Tiger 3 Collection : ‘टायगर 3’ पहिल्या दिवसाचे आकडे समोर; ‘बाहूबली २’ , ‘जवान’, ‘पठान’ टाकणार मागे | पुढारी

Tiger 3 Collection : 'टायगर 3' पहिल्या दिवसाचे आकडे समोर; 'बाहूबली २' , 'जवान', 'पठान' टाकणार मागे

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि कॅटरीना कैफचा ‘टायगर ३’ हा चित्रपट दिवाळी म्हणजे, १२ नोव्हेंबरला रिलीज होताच चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. चित्रपट थिअटरमध्ये पाहणाऱ्या प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. दरम्यान चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी धमाका करत ४४. ५० कोटींची भरघोष कमाई (Tiger 3 Collection )  केली आहे. पुढच्या दिवशी चित्रपटाचे आकडे असेल राहिले तर प्रभासचा ‘बाहुबली २’ आणि बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा ‘जवान’, ‘पठान’ चित्रपटाच्या कमाईला मागे टाकेल अशी आशा आहे.

संबंधित बातम्या 

सलमान आणि कॅटरिनाच्या जोडीने बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा धमाकेदार भूमिका साकारली आहे. ‘टायगर ३’ या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये भरघोष कमाई करत १५ कोटींची टप्पा गाठला होता. यानंतर एका रिपोर्टच्या माहितीनुसार, सलमान आणि कॅटरिनाच्या ‘टायगर ३’ चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ४४. ५० कोटींची कमाई केल्याची माहिती समोर आली आहे. चित्रपटाच्या कमाईचे आकडे दुसऱ्या दिवशी म्हणजे, सोमवारी असेच राहिले तर ‘टायगर ३’ प्रभासचा ‘बाहुबली २’ आणि शाहरुख खानच्या ‘पठाण’ आणि ‘जवान’ या दोन्ही चित्रपटांचे रेकॉर्ड मोडून काढेल अशी आसा आहे. तर हा ‘टायगर ३’ ओपनिंगवर तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरणार आहे.

प्रभासच्या ‘बाहुबली २’ ने पहिल्या सोमवारी ४०.२५ कोटींची कमाई केली होती. शाहरूखच्या ‘जवान’ ने पहिल्या सोमवारी ३०. ५ कोटीचे कलेक्शन केले होते. तर ‘पठाण’ने पहिल्या सोमवारी २५. ५ कोटींची कमाई केली होती. यावरून सलमानच्या ‘टायगर ३’ ने सोमवारी जर ४४. ५० कोटींची कमाई केली तर या चित्रपटाचे रेकॉर्ड ब्रेक होईल असे दिसतेय. सलमान आणि कॅटरिनासोबत या चित्रपटात इमरान हाश्मी यांनी ही भूमिका साकारली आहे. (Tiger 3 Collection )

Back to top button