‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं’ मध्ये योगेश सोहोनीची होणार एन्ट्री! | पुढारी

'छोट्या बयोची मोठी स्वप्नं' मध्ये योगेश सोहोनीची होणार एन्ट्री!

पुढारी ऑनलाईन डेस्क : बयोच्या स्वप्नपूर्तीचा प्रवास रेखाटणारी ‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि मौलिक संदेश देणारी मालिका प्रेक्षकांनी चांगलीच पसंतीस उतरली आहे. शिक्षणाच्या ध्यासाने कोकण ते मुंबई असा खडतर प्रवास करणारी बयो आता कुठे मुंबईच्या धावत्या वातावरणाशी जुळवून घेऊ लागली आहे. कुणाच्याही मदतीशिवाय डॉक्टर बनण्याचं आपलं स्वप्न उराशी बाळगून आलेल्या बयोला आता आणखी कुठल्या-कुठल्या आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे, हे मालिकेत पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी बयोच्या या नव्या प्रवासात डॉ. विशाल पाटील या नवीन व्यक्तिरेखेचा प्रवेश होणार आहे. डॉ. विशाल पाटीलच्या भूमिकेत प्रसिद्ध अभिनेता योगेश सोहोनी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

संबंधित बातम्या 

घराघरांत पोहोचलेला योगेश सोहोनी हा गोड चेहरा ‘छोट्या बयोची मोठी गोष्ट’ या मालिकेत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यास त्याचा कस लागणार आहे. योगेशने आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा डॉ. विशाल ही व्यक्तिरेखा काहीशी वेगळी असून योगेश या भूमिकेला नक्कीच न्याय देईल. अशी मत निर्मात्यांनी व्यक्त केले आहे.

डॉ. विशाल पाटील याचा प्रवेश मालिकेला कोणता नवं वळण देईल..?, डॉ. विशाल बयोला, तिच्या स्वप्नांना समजून घेऊ शकेल का..?, बयोच्या प्रवासात डॉ. विशाल तिला मदत करतो का..?, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ‘छोट्या बयोची मोठी गोष्ट’ या मालिकेत पाहायला मिळणार आहेत. यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Back to top button