Navi Janmen Me : नवी मालिका ‘नवी जन्मेन मी’ प्रेक्षकांच्या भेटीला

नवी जन्मेन मी
नवी जन्मेन मी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क :'नवी जन्मेन मी' ही मालिका 'सन मराठी' वाहिनीवर ६ नोव्हेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला आलीय. (Navi Janmen Me) 'सन मराठी'वरील 'नवी जन्मेन मी' या नव्या मालिकेत गावात राहणा-या एका बिनधास्त, अल्लड, जगाच्या दबावाखाली न बदलता जगालाच बदलायला लावणा-या मुलीची गोष्ट पाहायला मिळणार आहे. या जिद्दी, सर्वांच्या मनाचा अचूक ठाव घेणा-या भूमिकेचं नाव आहे स्वानंदी आणि ही प्रमुख भूमिका अभिनेत्री शिल्पा ठाकरे साकारणार आहे. (Navi Janmen Me)

संबंधित बातम्या – 

कोण म्हणतं फक्त शहरातल्याच मुली धीट आणि बिनधास्त असतात, गावाकडच्या मुलींमध्ये सुध्दा जगाशी दोन हात करण्याची ताकद असते आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे 'स्वानंदी'. स्वानंदी उर्फ शिल्पा ठाकरेचा या मालिकेत गाव ते शहर असा प्रवास दाखवण्यात येणार आहे. करियरच्या निमित्ताने गावाकडून शहरात आलेल्या स्वानंदीला नवीन जागेसोबत, शहरी वातावरणात कसं जुळवून घ्यावं लागणार आहे, त्यामध्ये आलेल्या चॅलेंजेसला कसं सामोरं जावं लागणार आहे, हे या मालिकेत पाहायला मिळणार आहे. स्वानंदीचा स्वत:वर असा विश्वास आहे की, ती जगाला बदलू शकते, पण तिच्या याच स्वभावामुळे तिला काय काय अनुभवावं लागेल हे प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

तसेच या मालिकेत मणीराज पवार, रोहन गुजर आणि साक्षी गांधी या कलाकारांच्या देखील प्रमुख भूमिका आहेत. मणीराज पवार यामध्ये 'मणी' ची भूमिका साकारतोय जो अतिशय शांत, समजूतदार, कामसू, दुसऱ्यांना मदत करणारा आणि उपकारांची जाणीव असणारा मुलगा आहे. या मालिकेतील 'सुजित' या भूमिकेत अभिनेता रोहन गुजर दिसणार आहे. रोहनची भूमिका ही खुषालचेंडू. श्रीमंतीचा माज नसला तरी त्याचा पूर्ण उपभोग घेणारा, शातिर, बाबांच्या धाकात असणारा आणि आईला गुंडाळण्यात एक्सपर्ट, मुलींसाठी चार्मिंग बॉय असा हा सुजित.

मालिकेचे दोन नायक भिन्न स्वभावाचे, ते समोरासमोर आले तर काय होईल हे पाहणं रंजक असणार आहे. या मालिकेतील आणखी एक अनोखं पात्रं म्हणजे 'संचिता'. अभिनेत्री साक्षी गांधी साकारत असणारी 'संचिता' ही भूमिका महत्त्वाकांक्षी, चलाख आणि कुणाशी कसं वागावं याची जाणीव असणारी. या चारही भूमिका प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी लवकरच सज्ज होणार आहेत.

नितीन वैद्य आणि निनाद वैद्य यांचे 'दशमी क्रिएशन्स' यांची निर्मिती असलेल्या 'नवी जन्मेन मी' मालिकेचे दिग्दर्शन मिलिंद पेडणेकर, स्वप्नील शिवाजी वारके हे करणार असून अपर्णा पाडगावकर, अभिजीत शेंडे यांनी कथा लिहिली आहे.

'नवी जन्मेन मी' मालिकेच्या निमित्ताने शिल्पा ठाकरेने छोट्या पडद्यावर दमदार एंट्री केली आहे. शिल्पाचे डोळे फार बोलके आहेत, तिच्या एक्सप्रेशन्समुळे ती लोकप्रिय ठरली. शिल्पाने खिचिक, ट्रिपल सीट, इभ्रत, प्रेमा, भिरकीट या सिनेमात काम केले आहे. आता या मालिकेच्या निमित्ताने शिल्पा अल्लड, गोड स्वानंदीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news