‘ये रिश्ता क्या कहलाता है’चे नवे पर्व; समृद्धी शुक्ला-शहजादा धामी मुख्य भूमिकेत

अभिरा
अभिरा

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'स्टार प्लस' वाहिनीवरील 'ये रिश्ता क्या कहलाता है' या लोकप्रिय मालिकेच्या नव्या पर्वाला ६ नोव्हेंबरपासून सुरूवात झाली. यामध्ये समृद्धी शुक्ला आणि शहजादा धामी मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेचा नवा प्रोमो प्रसारित झाला होता. नव्या पर्वात भूमिका करणाऱ्या समृद्धी शुक्ला, शहजादा धामी, शिवम खजुरिया आणि प्रतीक्षा होनमुखे हे अनुक्रमे अभिरा, अरमान, रोहित आणि रुही हे पात्र साकारणार आहेत.

संबंधित बातम्या –

अभिराचा अरमानशी विवाह झाला असला, तरी त्यांच्या कुटुंबियांनी या दोघांचे लग्न स्वीकारलेले नाही, या वळणावर ही मालिका पुढे जाणार आहे. अभिरा, अरमान, रुही आणि रोहित यांच्या नशिबात नक्की काय वाढून ठेवले आहे, आणि हे सारे घडताना त्यांचे नाते परस्परांशी कसे गुंफले जात आहे, एक वेगळा अनुभव असेल.

समृद्धी शुक्ला म्हणते, "अभिरा आणि अरमान यांचे व्यक्तिमत्व परस्परांपासून पूर्णपणे वेगळे आहे. अभिरा ही एक स्वतंत्र मुलगी आहे; अरमानकडे त्याचे करिअर सुरू करण्याच्या वेगवेगळ्या योजना आहेत, परंतु अभिरा आणि अरमान या दोघांकरता नियती काही वेगळेच योजत आहे."

सध्या हर्षद चोप्रा आणि प्रणाली राठोड 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत प्रमुख पात्रे साकारत आहेत. या दोन्ही कलाकारांनी अभिमन्यू आणि अक्षरा यांच्या भूमिका निभावल्या आहेत. प्रणाली राठोड आणि हर्षद चोप्रा यांनी मालिकेचा निरोप घेतल्याने समृद्धी शुक्ला आणि शहजादा धामी यांना मालिकेतील भूमिका साकारण्याचा मार्ग खुला झाला आहे.

या मालिकेची निर्मिती राजन शाही यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news