इंडियाज गॉट टॅलेंट : यादिवशी होणार ग्रँड फिनाले, टॉप ६ स्पर्धकात चुरस

India's Got Talent
India's Got Talent

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियाज गॉट टॅलेंटमध्ये टॉप 6 स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे. हे टॉप 6 स्पर्धक आहेत – बॉलीवूड हिप-हॉप डान्सर्स- मुंबईचे झीरो डिग्री, छत्तीसगडचा एरियल मलखांब ग्रुप अबुझमाड मलखांब अकादमी, कोलकाताहून आलेला जबरदस्त डान्स ग्रुप गोल्डन गर्ल्स, 'अॅक्रो डान्सर्स' The ART (उत्तर प्रदेशचा अभिषेक, जयपूरचा राहुल आणि मुंबईचा तेजस), भारतीय शास्त्रीय फ्यूजन बॅंड रागा फ्यूजन (लुधियानाचा जयंत पटनाईक, मध्यप्रदेशचा अजय तिवारी, पटणाचा अमृतांशु दत्ता आणि पटणाचाच हर्षित शंकर) आणि नागालँडचा पॉवर पॅक्ड बॅंड महिला बॅंड.

छत्तीसगडमधील एका छोट्याशा गावातून आलेल्या अबुझमाड मलखांब अकादमीने हे सिद्ध करून दाखवले की, कठोर परिश्रम आणि दृढनिर्धार असल्यास काहीच अशक्य नसते. खांबांचा उपयोग करून त्यांनी केलेल्या मलखांबच्या करामती पाहून परीक्षकांनी त्यांची खूप वाहवा केली. इतकेच नाही, तर या शोमधला त्यांचा प्रवास पाहून अत्यंत प्रभावित झालेल्या किरण खेर आणि बादशाह या दोघा परीक्षकांनी तर या कला प्रकाराला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या अकादमीला वित्तसहाय्य करण्याचे देखील वचन दिले.

नागालँडच्या महिला बँडमधील मुली जेव्हा ऑडिशन फेरीत गणवेशात मंचावर आल्या, तेव्हा त्यांनी सर्वांना थक्क केले आणि 'आज की नारी, सबसे भारी' हे सिद्ध केले. दर आठवड्याला त्यांनी सादर केलेला रॉक आणि फंक संगीत परफॉर्मन्स परीक्षक आणि आमंत्रित पाहुण्यांना देखील मंचावर जाऊन त्यांच्यासोबत ठेका धरायला लावायचा.

सतत काही ना काही नावीन्यपूर्ण करणाऱ्या आणि मंत्रमुग्ध करणारे डान्स परफॉर्मन्स देणाऱ्या 40 सदस्यांच्या गोल्डन गर्ल्स या ग्रुपने अप्रतिम रचना करून सर्वांना थक्क केले.

'छोटा पॅक बडा धमाका' ही उक्ती सार्थ करणाऱ्या मुंबईच्या झीरो डिग्री या बॉलीवूड हिप-हॉप डान्सर्स ग्रुपने परीक्षकांसोबत देशातील लक्षावधी प्रेक्षकांचे हृदय देखील जिंकून घेतले. दर आठवड्याला परीक्षक आणि आमंत्रित पाहुण्यांना प्रभावित करत, विविध अंगांनी आपली प्रतिभा सादर करून एक एक पायरी चढत हे छोटे वीर आता ग्रँड फिनालेमध्ये येऊन दाखल झाले आहेत.

गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध डान्स मूव्ह्ज आणि अॅक्रोबॅट्स करणाऱ्या 'तीन शरीरे पण एक मन' असणाऱ्या The ART (उत्तर प्रदेशचा अभिषेक, जयपूरचा राहुल आणि मुंबईचा तेजस) ग्रुपने परीक्षकांना आणि खास करून शिल्पा शेट्टीला फारच प्रभावित केले. त्यांच्या जबरदस्त अॅक्रोबॅटिक मूव्ह्ज पाहून शिल्पा शेट्टीने कित्येकदा परीक्षकांच्या पॅनलवर उभे राहून त्यांचे कौतुक केले आहे. पण इतकेच नाही, तर या तीन कलाकारांनी दर आठवड्याला आपल्या अॅक्टमधून काही ना काही संदेश देखील दिला.

रागा फ्यूजनने (लुधियानाचा जयंत पटनाईक, मध्यप्रदेशचा अजय तिवारी, पटणाचा अमृतांशु दत्ता आणि पटणाचाच हर्षित शंकर) अनोखी आणि एकापेक्षा एक सुंदर फ्यूजन सादर करून फिनालेमध्ये प्रवेश मिळवला आहे. दरेक आठवड्यात हा ग्रूप शास्त्रीय स्पर्श देऊन, छोटी रोपे, बाटल्या यांचा वाद्यांसारखा उपयोग करून गाण्यांचे अप्रतिम फ्यूजन करत होता.

इंडियाज गॉट टॅलेंटचा ग्रँड फिनाले 4 आणि 5 नोव्हेंबर रोजी पाहायला मिळणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news