शाहरूख खानचे ५८ व्या वर्षात पदार्पण, त्याचे टॉप १० चित्रपट पाहिले का?

शाहरुख खान
शाहरुख खान

पुढारी ऑनलाईन डेस्क : शाहरूख खानने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले, ते राज कंवरच्या दीवाना चित्रपटातून व त्यामध्ये मुख्य भुमिकेमध्ये त्याच्याबरोबर ऋषी कपूर आणि दिव्या भारती होते. या इंडस्ट्रीमध्ये तीन दशकांहून अधिक कालावधीच्या करिअरमध्ये शाहरूख खान डीडीएलजे, कल हो ना हो आणि चक दे! इंडिया. अशा उत्तम चित्रपटांचा भाग राहिला आहे. या वर्षी त्याने दोन ब्लॉकबस्टर हिट्स दिले आहेत- पठान आणि जवान. अनेक वेळेस सर्वोत्तम अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवलेला हा अभिनेता येणाऱ्या काळात राजकुमार हिरानीच्या डंकीमध्ये दिसेल व त्यात त्याच्यासोबत तापसी पन्नू आणि बोमन इरानी असतील.

IMDb वरील शाहरूख खानचे सर्वोच्च रेटींग असलेले टॉप 10 चित्रपट असे आहेत.

स्वदेस – 8.2

चक दे इंडिया – 8.1

फौजी – 8.1

डीडीएलजे – 8.0

माय नेम इझ खान – 7.9

कल हो ना हो – 7.9

हे राम – 7.9

सर्कस – 7.8

वीर जारा – 7.8

कभी हां कभी ना – 7.6

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news