Dunki Teaser : ‘डंकी’चा धासू टीझर भेटीला (VIDEO); काही बोलू नका, फक्त पाहा | पुढारी

Dunki Teaser : 'डंकी'चा धासू टीझर भेटीला (VIDEO); काही बोलू नका, फक्त पाहा

पुढारी ऑनलाईन डेस्क : शाहरुखच्या वाढदिवसादिवशी फॅन्सना मोठे गिफ्ट मिळाले आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर आता डंकी चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आलाय. डंकी राजकुमार हिरानी दिग्दर्शित चित्रपटात शाहरुख मुख्य भूमिकेत आहे. (Dunki Teaser) शाहरुख आणि राजकुमार यांचे हे पहिले सहयोग असून चित्रपटांविषयी जबरदस्त चर्चा पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर डंकी चित्रपटाची क्रेझ दिसत आहे. डंकीच्या ट्रेलरचा ट्रेंड सोशल मीडियावर सुरु आहे. य़ा चित्रपटाच्या टीझर सेन्सॉर बोर्डाने पास केलं आहे. (Dunki Teaser)

शाहरुखचा आज २ नोव्हेंबर रोजी वाढदिवस आहे. डंकीचा पहिला टीझर आज रिलीज झालाय. यासाठी शाहरुखने मुंबईमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजनदेखील केले आहे. तिथे शाहरुख सर्वांसोबत मिळून टीझर पाहतील.

संबंधित बातम्या –

सेन्सॉर बोर्डाकडून दोन टीझरना परवानगी 

निर्मात्यांनी सेन्सॉर बोर्डाच्या समोर २ टीझर सबमिट केले होते. त्यातील पहिला टीझर एक मिनिटहून थोडे कमी आहे. आणि दुसरा टीझर जवळपास २ मिनिटांचा आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, टीझरच्या माध्यमातून राजकुमार हिरानींची दुनिया प्रेक्षकांसमोर आणली जाईल. या चित्रपटाचा प्रचारदेखील चांगला होत आहे. शाहरुख खान एकदम वेगळ्या अवतारात दिसणार आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट ख्रिसमसच्या निमित्ताने एन्जॉय करायला तयार आहेत.

‘सालार’शी होणार टक्कर

रिपोर्टनुसार, डंकी हा ग्लोबल चित्रपट मानला जात आहे. डंकीचा टीझर टायगर ३ सोबत जगभरातील चित्रपटगृहात दाखवला जाईल. या चित्रपटामध्ये ड्रामा, कॉमेडी, इमोशन्स सोबत सोशल मेसेजदेखील देण्यात आला आहे. डंकी २२ डिसेंबर, २०२३ रोजी रिलीज केला जाईल.

Back to top button