Anushka and Ranveer : ‘…म्हणून मी रणवीरला डेट केले नाही’; अनुष्काचा जुना व्हिडिओ व्हायरल | पुढारी

Anushka and Ranveer : '...म्हणून मी रणवीरला डेट केले नाही'; अनुष्काचा जुना व्हिडिओ व्हायरल

अभिनेत्री अनुष्का शर्मा व अभिनेता रणवीर सिंह परस्परांना डेट करत असल्याच्या चर्चेमुळे बॉलीवूडमध्ये धुऱळा उडाला होता. (Anushka and Ranveer) याचे कारणही तसेच होते. ‘बँड बाजा बारात’, ‘लेडिस वर्सेस रिकी बहल’, ‘दिल धडकने दो’ या सिनेमांत दोघांनी एकत्र काम केले होते. यानंतर अनुष्काने रणवीरला कोणत्या कारणास्तव डेट करत नाही याचे कारण सिमी गरेवालच्या शोमध्ये सांगितले होते. आता रणवीर आणि दीपिकाने ‘कॉफी विथ करण’ या शोच्या आठव्या पर्वात हजेरी लावल्यानंतर अनुष्काचा जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे, यामध्ये ती रणवीरबद्दल बोलताना दिसत आहे. (Anushka and Ranveer)

मुलाखतीत तू रणवीरला डेट का करत नाहीस? असे सिमी तिला विचारते. उत्तर देताना अनुष्काने सर्वात आधी रणवीरला डेट करत नसल्याचे स्पष्ट केले. ती म्हणाली, आमचे नाते निव्वळ मैत्रीचे आहे. मुख्य म्हणजे आम्ही दोघेही जीवनाकडे बघतो. तो अतिशय प्रॅक्टिकल आहे, मी अजिबात प्रॅक्टिकल नाही. मला तो आवडतो, तो आकर्षक आहे. पण, माझ्यासाठी नातं फालतू असू शकत नाही. अर्थात, पुढे काय घडले हे सर्वांनाच माहीत आहे.  अनुष्का क्रिकेटपटू विराट कोहलीला डेट करत होती. दोघांनी काही वर्षे डेट केल्यानंतर इटलीत एका शानदार समारंभात लग्नगाठ बांधली, तर रणवीरने दीपिका पदुकोणशी लग्न केले. पाठोपाठ या सगळ्याच चर्चांना विराम मिळाला. (Anushka and Ranveer)

हेही वाचलंत का?

Back to top button