HBD Prabhas : प्रभासचे 10 धासू चित्रपट, तुम्ही पाहायलाच हवे | पुढारी

HBD Prabhas : प्रभासचे 10 धासू चित्रपट, तुम्ही पाहायलाच हवे

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ स्टार प्रभासचा आज 23ऑक्टोबर रोजी वाढदिवस आहे. (HBD Prabhas) त्याने अभिनय करिअरची सुरूवात 2002 मध्ये जयंत पारंजी दिग्दर्शित ‘ईश्वर’ या तेलुगू चित्रपटापासून केली होती. बाहुबली: द बीगिनिंग, बाहुबली 2: द कन्क्लुजन, आणि साहो अशा ब्लॉकबस्टर हिट्स चित्रपटांमधील त्याच्या भुमिकांमुळे त्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय लोकप्रियता मिळाली. प्रभासचा आगामी चित्रपट सालार आहे व त्याचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे. यामध्ये तो पृथ्वीराज सुकुमारन आणि श्रुती हासनसोबत दिसणार आहे. (HBD Prabhas)

प्रभासचे IMDbवरील सर्वोच्च रेटींग असलेले चित्रपट असे आहेत.

बाहुबली 2: द कन्क्लुजन – 8.2

बाहुबली: द बीगिनिंग – 8.0

छत्रपती – 7.6

डार्लिंग – 7.4

मिरची – 7.3

वर्शम् – 7.1

मिस्टर परफेक्ट -7.0

बुज्जीगाडू: चेन्नईमध्ये बनवलेले – 6.3

चक्रम – 6.1

बिल्ला – 6.1

Back to top button