Urvashi Rautela : फोन परत पाहिजे असेल तर….;उर्वशीचा हरवलेला आयफोन परत मिळणार

Urvashi Rautela
Urvashi Rautela

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा ( Urvashi Rautela ) गेल्या काही दिवसांपासून २४ कॅरेट सोन्याने मढवलेला आयफोन चोरीला गेला होता. यानंतर तिने पोलिसांत तक्रार करून 'कोणाला माझा आयफोन सापडला असल्यास त्यांनी तो परत करावा' अशी सोशल मीडियावरून व्हायरल केलं होते. याच दरम्यान चोराचा एक मेल आल्याने उर्वशीचा आयफोन सापडण्याचे समोर आलं आहे. परंतु, या मेलमधून उर्वशीला एका खास गोष्टीची मागणी करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या 

अभिनेत्री उर्वशी रौतेला ( Urvashi Rautela ) काही दिवसापूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना पाहण्यासाठी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर गेली होती. त्यावेळी तिचा २४ कॅरेट सोन्याने मढवलेला आयफोन चोरीला गेला होता. या घटनेनंतर उर्वशीने अहमदाबाद पोलिसांना टॅग करत तिचा आयफोन चोरीला गेल्याची माहिती दिली होती. याच दरम्यान तिने 'माझा आयफोन हरवला आहे. कृपया, कोणाला तो सापडल्यास मला फरत करावा' अशी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली होती. आता फोन चोरणाऱ्या चोराचा एक मेल उर्वशीला आला आहे. यावरून तिला चोरीला गेलेला आयफोन लवकरच मिळणार असल्याचे समोर येत आहे. हा मेल Groww Traders नावाने आला आहे. मात्र, मेलमधून चोराने तिच्याकडे पैशांची मागणी केली आहे.

उर्वशीला केलेल्या मेलमध्ये लिहिले आहे की, 'तुझा फोन माझ्याजवळ सुखरूप आहे. परंतु, आयफोन परत हवा असेल तर माझी एक मदत करावी लागणार आहे. माझ्या भावाला कॅन्सर झाला आहे, त्याच्यावरील उपचारासाठी मी आयफोन चोरला आहे. त्याच्या उपचारासाठी मला पैसांची गरज आहे. ती पूर्ण करावी लागेल.' दरम्यान उर्वशीने या मेलवर थम्सअप असा रिप्लाय दिला आहे. या घटनेचा तिने स्क्रीनशॉट देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे.

याच दरम्यान सोशल मीडियावर काही नेटकरी उर्वशीला पोलिसांत जा असा सल्ला देत आहेत. तर काही युजर्सना तिला तिचा आयफोन परत मिळणार म्हणून आनंद झाला आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news