Dunki : ‘डंकी-सालार’मध्ये बिग क्लॅश, बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी? | पुढारी

Dunki : 'डंकी-सालार'मध्ये बिग क्लॅश, बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी?

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजकुमार हिरानी दिग्दर्शित, शाहरुख खान स्टारर डंकी (Dunki) चित्रपट २२ डिसेंबरला रिलीज होणार होता. दरम्यान, साऊथ सुपरस्टार प्रभासने आपला चित्रपट ‘सालार : पार्ट १ सीजफायर’ च्या रिलीजसाठी ही तारीख निवडली आहे. दोन्ही सुपरस्टार्सच्या चित्रपटांचे बॉक्स ऑफिसवर बिग क्लॅश होताना दिसेल, असे म्हटले जात आहे. पण, ‘सालार’शी क्लॅश होऊ नये म्हणून ‘डंकी’ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात येणार, असल्याचे म्हटले जात आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी आता रिलीजवर मोठे अपडेट शेअर केले आहे. (Dunki)

संबंधित बातम्या –

‘डंकी’ची रिलीज डेट बदलणार नाही

‘डंकी’च्या निर्मात्यांनी पुष्टी केली आहे की, हा चित्रपट ठरलेल्या तारखेलाच चित्रपटगृहात रिलीज होईल. आता ख्रिसमस २०२३ च्या निमित्ताने चित्रपटाच्या स्क्रीनसाठी संघर्ष पाहायला मिळेल. कारण, शाहरुख खानचा ‘डंकी’ आणि प्रभास स्टारर ‘सालार : पार्ट १ सीजफायर’ एकत्र रिलीज होईल.

‘डंकी’ या वर्षी जूनमध्ये रिलीज होणार होती. पण, डिसेंबर पर्यंत रिलीड डेट टाळण्यात आली. ‘सालार: पार्ट 1 – सीजफायर’ २८ सप्टेंबर रोजी रिलीज होणार होता, तेही काही कारणांनी पुढे ढकलले.

‘डंकी’साठी उत्साहित शाहरुख

शाहरुख खानने ‘डंकी’ विषयी लिहिले होते, ‘आता नवं वर्ष आणि ख्रिसमस जवळ आहे, आम्ही डंकी रिलीज करु. मी राष्ट्रीय एकात्मेसाठी..तसं पाहिलं तर जेव्हा माझा चित्रपट रिलीज होतो तेव्हा ईद असते. मी खूप मेहनत करत आहे. मी मागील २९ वर्षांमध्ये जेवढी मेहनत केली, त्यापेक्षा अधिक मेहनत करत आहे. मी खूप कष्ट करत राहीन. कारण, जेव्हा लोक चित्रपट पाहिल्यानंतर खुश होतात, तेव्हा मला सर्वाधिक आनंद होतो.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Hombale Films (@hombalefilms)

Back to top button