गँगस्टर ड्रामा वेबसीरिज ‘पान पर्दा जर्दा’ लवकरच भेटीला | पुढारी

गँगस्टर ड्रामा वेबसीरिज 'पान पर्दा जर्दा' लवकरच भेटीला

पुढारी ऑनलाईन डेस्क : जिओ स्टुडिओजने २७ सप्टेंबर रोजी त्यांच्या हाय-ऑक्टेन गँगस्टर ड्रामा ‘पान पर्दा जर्दा’ या वेबसिरीजचे शूटींग सुरु केले आहे. रिलायन्स एंटरटेनमेंट आणि ड्रीमर अँड डूअर्स कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने संकल्पनात्मक आणि निर्मित या वेबसीरिजमध्ये गुरमीत सिंग (मिर्झापूर आणि इनसाइड एज) आणि शिल्पी दासगुप्ता यांनी दिग्दर्शन केलं आहे. पॉवरहाऊस शोरनरची टीम मृघदीप सिंग लांबा, सुपर्ण वर्मा आणि हुसैन दलाल तसेच अब्बास दलाल ही प्रतिभावान लेखक जोडी एकत्रित येणार आहे.

संबधित बातम्या

‘पान पर्दा जर्दा’ ही एक रोमांचकारी गँगस्टर ड्रामा वेबसिरीज आहे. जी मध्य भारतातील बेकायदेशीर अफूच्या तस्करीच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. अशी एक आकर्षक कथा जिथे कुटुंब आणि प्रियजनांमध्ये युद्धाच्या रेषा आखल्या जातात आणि निष्ठा बदलली जाते. असे या बेवसारिजमध्ये दाखविण्यात आलं आहे.

दिग्गज दिग्दर्शक गुरमीत सिंग, शिल्पी दासगुप्ता, क्रिएटिव्ह टॅलेंट मृघदीप सिंग लांबा, सुपर्ण वर्मा, हुसेन दलाल आणि अब्बास दलाल, राधिका आनंद आणि विभा सिंग यांच्या नेतृत्वाखाली बनणाऱ्या या वेबसिरीजमध्ये ओटीटीचे नामवंत कलाकार मोना सिंग, तन्वी आझमी, प्रियांशू पैन्युली, तानया माणिकतला, सुशांत सिंग, राजेश तैलंग आणि मनु ऋषी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

हेही वाचा : 

Back to top button