‘जवान’च्या शूटिंगवेळी कोलमडले बजेट, शाहरुखने घेतला ताबा आणि…

‘जवान’च्या शूटिंगवेळी कोलमडले बजेट, शाहरुखने घेतला ताबा आणि…
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जवान चित्रपटाचे बजेट जवळपास 300 कोटींचे आहे. दिग्दर्शक अ‍ॅटली कुमार म्हणाले की, सुरुवातीला आम्‍हाला काळजी वाटत होती की एवढ्या मोठ्या बजेटचा चित्रपट चालेल की नाही. परंतु शाहरुखच्या धाडसासमोर सर्व काही फिके ठरले.

जवान बॉक्स ऑफिसवर कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडत आहे. या चित्रपटाने जगभरात 800 कोटींहून अधिक कमाई केली आहे. या यशामुळे संपूर्ण टीम आनंदाने उड्या मारत आहे. त्याचबरोबर जवानचा सीक्वलही लवकरच येईल, अशी आशा चाहत्यांनी व्यक्त केली आहे.
अलीकडेच एका कार्यक्रमादरम्यान दिग्दर्शक म्‍हणाले, जेव्हा हा चित्रपट बनवला जात होता तेव्हा त्याचे निश्चित बजेट ओलांडले होते. आणि यापुढे काय करायचे असा प्रश्न सर्वांना होता अशा कठीन प्रसंगी शाहरुख खानने पुढाकार घेत त्याची भरपाई केली.

जवानचे बजेट 300 कोटींचे

जवान हा चित्रपट 300 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. अ‍ॅटली कुमार म्हणाले की, सुरुवातीला सर्वांनाच याची काळजी वाटत होती. एवढ्या मोठ्या बजेटचा चित्रपट चालेल की नाही, अशी भीती सगळ्यांच्या मनात होती. मात्र शाहरुखच्या धाडसासमोर सर्वजण अपयशी ठरले. ॲटली कुमार म्‍हणाले मी कोरोनाच्या काळात झूम कॉलवर चित्रपटाचे वर्णन दिले होते. मला माहीत होतं की त्या वेळी नाट्यक्षेत्रात सातत्याने घसरण होत होती. पण शाहरुखने याला हिरवा कंदील दिला आणि ३०० कोटींचे बजेट पास केले.

पुढे बोलताना ते म्‍हणाले, पण आम्ही 300 कोटींवरही थांबलो नाही. शूटिंग करताना आमचे बजेट वाढले. आम्ही तीन दिवसात एक ब्लॉकबस्टर वितरित केला आहे. आणि आता आम्ही हवेत उडत आहोत.

जवानचा सिक्वेल बनवणार

जवान आणि विक्रम राठौरचे पात्र लोकांना इतके आवडते की प्रत्येकजण त्याच्या सिक्वेलची मागणी करत आहे. यावर प्रतिक्रिया देताना ॲटली म्हणाले, मी सिक्वेल बनवणार नाही पण चित्रपटात शाहरुख खानचा सीनियर व्हर्जन असलेल्या विक्रम राठोडचा स्पिन-ऑफ नक्कीच करेन. असे म्‍हणाले.

.हेही वाचा  

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news