यंदाच्या गणेश उत्सवासाठी ‘लालबागचा राजा सॉंग २०२३’ लॉन्च

लालबागचा राजा सॉंग २०२३
लालबागचा राजा सॉंग २०२३
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : गणेश चतुर्थीचा दिव्य सण साजरा करण्यासाठी संपूर्ण देश सज्ज होत असताना बहुप्रतिष्ठित 'लालबागचा राजा सॉंग २०२३' गाण्याच्या लॉन्च करण्यात आलं आहे. हा एक प्रकारचा संगीतमय प्रसंग असून लालबागचा राजा आणि मुंबईची जीवनवाहिनी असणाऱ्या मुंबईच्या डब्बावाल्यांच्या एकत्र येण्याचा उत्सव साजरा होणार आहे.

'लालबागचा राजा सॉंग २०२३' हे गाणं अतिशय प्रतिभावंत गायक हर्षवर्धन वावरे यांनी गायिले आहे. तर त्रिनीती ब्रदर्स यांनी संगीतबद्ध केलेले तसेच विनायक शिंदे आणि त्रिनीती ब्रदर्स यांनी लिहिलेले आहे. या गाण्याच्या व्हिडिओला आणखी आकर्षक बनवणारी गोष्ट म्हणजे, मुंबईच्या लाडक्या डब्बावाल्यांशी असलेला संबंध, जे अनेक दशकांपासून मुंबईचे अपरिचित नायक म्हणून कार्यरत आहेत. या गीताच्या माध्यमातून डब्बावाल्यांचा प्रामाणिकपणा आणि हृदयस्पर्शी महत्व दिसून येत आहे.

गणेश चतुर्थी, देशभरातील कोट्यवधी भाविकांच्या मनात गुंजणारा तसेच मुंबईकरांच्या हृदयात विशेष स्थान ठेवणारा सण आहे. असंख्य भक्तांचा आदरणीय देवता असलेला लालबागचा राजा हे या भव्य उत्सवाचे केंद्रस्थान आहे. या उत्सवातील भक्ती व शक्ती असलेल्या लालबागच्या राजाला सर्वप्रथम या गाण्याच्या रूपाने श्रद्धा-भाव अर्पण केली आहे.

बाळासाहेब कांबळे ( अध्यक्ष – लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ) म्हणाले की, 'भक्तीचे नवीन गाणे 'लालबागचा राजा सॉंग २०२३'  हे लालबागचा राजा गणेश उत्सव मंडळ आणि शेमारू एंटरटेनमेंटमधील घनिष्ट सहकार्याचा दाखला आहे. आम्ही ही या गाण्याचा एक भाग होता आल्याने आम्हाला आनंद होत आहे. हे गाणे भाविकांच्या श्रद्धेला आणि भक्तिला चालना देणारे असून हा व्हिडिओ भक्ती आणि एकतेच्या भावनेचा उत्सव साजरा करेल अशी खात्री आहे'.

गाण्याच्या शुभारंभप्रसंगी उत्साह व्यक्त करताना लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सचिव सुधीर साळवी (भाऊ) म्हणाले की, 'लालबागच्या राजाचे हे ९० वे वर्ष आहे. यावर्षी 'लालबागचा राजा सॉंग २०२३' प्रसिद्ध लालबाग मार्केट गल्ली येथील लालबागचा राजाच्या मंडपामध्ये चित्रित करण्यात आले आहे. हे गाणे आपल्या हृदयात गुंजत राहो आणि या गणेश उत्सवात आपल्या सर्वांवर लालबागच्या राजाची असीम कृपा लाभो'. असे ते म्हणाले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news