

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड स्टार किड्सचे पदार्पण लवकरच 'द आर्चीज' या चित्रपटातून होणार आहे. द आर्चीजच्या (The Archies) निर्मात्यांनी मंगळवारी या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली. झोया अख्तर दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुख खानची मुलगी सुहाना खान, श्रीदेवीची मुलगी खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा यांची प्रमुख भूमिका असणार आहे. 'द आर्चीज' चित्रपट ७ डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होईल. (The Archies)
द आर्चीजची कथा नेमकी आहे तरी काय? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. याविषयी सुहाना खानने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिने कॅप्शन म्हटलंय-'द आर्चीज' ७ सप्टेंबरला दाखल होणार आहे. सुहानाने काही तासांपूर्वी अपडेट दिली असून आर्चीजचे एक पोस्टर शेअर केला आहे. कॅप्शनमद्ये लिहिलंय-100 days till you meet The Archies! ??
The Archies are all set to arrive on December 7th!!#100DaysToGo ??