Saif Ali Khan : ज्यु. एनटीआरकडून सैफच्या बर्थडेला सरप्राईज! ‘देवरा’मधील BHAIRA लूक रिलीज

saif ali khan
saif ali khan
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सैफ अली खानचा आज १६ ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे. या निमित्ताने ज्यु. एनटीआरने सैफ अली खानचा (Saif Ali Khan) देवरा या चित्रपटातील लूक रिलीज केला आहे. सैफ या चित्रपटात भईरा या भूमिकेत असेल. ज्यु. एनटीआरने सैफला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सैफचा हा लूक रिलीज केलाय. ज्यु. एनटीआरने लिहिलंय- BHAIRA Happy Birthday Saif sir ! #Devara. (Saif Ali Khan)

देवरा हा तेलुगू चित्रपट अशून ज्यु. एनटीआर मुख्य भूमिकेत आहे. शिवा कोरतला दिग्दर्शित चित्रपटात जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत आहे. तर सैफ खलनायकाच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट एनटीआर आर्ट्स आणि युवा सुधा आर्ट्स बॅनर अंतर्गत होत असून अनिरुद्ध रविचंदर यांनी संगीत दिलं आहे.

ज्यु. एनटीआरने शेअर केलेल्या पोस्टरवर सैफ लांब केसांमध्ये दिसतो आहे. त्याच्यामागे मोठे डोंगर दिसत असून नदी आणि होड्याही दिसत आहेत. सैफच्या चाहत्यांसाठी हे मोठे सरप्राईज आहे. 'देवरा' ५ एप्रिल २०२४ रोजी रिलीज होणार आहे.

शेवटचा चित्रपट आदिपुरुषमध्ये सैफ दिसला होता.

करीनाच्या अनोख्या शुभेच्छा

सैफच्या ५३ व्या वाढदिवसाला करीना कपूरने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करून अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. करीनाने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये दोघे स्वीमिंग पूलच्या किनार पाण्यात पाय घालून पोज देताना दिसताहेत. सैफ शर्टलेस तर करीना कपूर मोनोकिनीमध्ये दिसते.

करीनाने फोटो पोस्टमध्ये लिहिलं-

'इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यासाठी हा खास फोटो सिलेक्ट केला. तू असाच रिलॅक्स्ड राहा…मेरी जान. माझ्या प्रेमाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. खरचं तुझ्यासारखा कुणीही नाही. इतका उदार, इतका वेडा, इतका खुळा. मी हे सर्व तुझ्याविषयी दिवसभर लिहू शकते. पण आता केक देखील खायचा आहे.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news