जयाप्रदा यांना सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा, दंडही

जयाप्रदा यांना सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा, दंडही

चेन्नई : आपल्या मालकीच्या चित्रपटगृहातील कर्मचार्‍यांचे राज्य कामगार विमा योजनेचे हप्ते न भरल्याबद्दल प्रसिद्ध अभिनेत्री आणि माजी खासदार जयाप्रदा यांना येथील न्यायालयाने शुक्रवारी सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्यांना पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

रायपेटा (चेन्नई) येथे जयाप्रदा यांच्या मालकीचे चित्रपटगृह असून राम कुमार व राजा बाबू हे दोघे ते चालवतात. आपले कामगार विमा हप्त्याचे पैसे न भरल्यामुळे जयाप्रदा यांच्याविरुद्ध कामगारांनी न्यायालयात दाद मागितली होती. त्यापूर्वी कामगारांना यासंदर्भातील संपूर्ण रक्कम देण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, ते पाळले गेले नाही. तसेच राज्य कामगार विमा योजनेच्या वकिलांनीही जयाप्रदा यांच्या कृतीला आक्षेप घेतला. त्यानंतर न्यायालयाने जयाप्रदा व इतर तिघांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावून प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news