तारीख ठरली! आयुष्मान -रकुल प्रीतचा डॉक्टर जी ‘या’ दिवशी भेटीला

तारीख ठरली! आयुष्मान -रकुल प्रीतचा डॉक्टर जी ‘या’ दिवशी भेटीला
Published on
Updated on

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना, रकुल प्रीत सिंह आणि शेफाली शाह यांच्या बहुप्रतिक्षित 'डॉक्टर जी' हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीस येत आहे. सध्या या चित्रपटाच्या पोस्टरसह चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा झाली आहे.

गेल्या आठवड्यात 'बधाई दो' च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाल्यानंतर आता जंगली पिक्चर्सने बहुप्रतिक्षित 'डॉक्टर जी' चित्रपटाच्या थिएट्रीकल प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. यासोबत सोशल मीडियावर एक पोस्टर सोशल मीडियावर रिलीज झाले आहे.

या पोस्टरमध्ये आयुष्मानसोबत रकुल प्रीत सिंह दोघेजण डॉक्टरांच्या वेशभूषेत दिसत आहेत. या चित्रपटात कॅम्पस कॉमेडी ड्रामामध्ये रकुल आणि अभिनेत्री शेफाली शाह यांच्यासोबत आयुष्मान पहिल्यांदाच स्त्रीरोगतज्ज्ञाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये '#DoctorG १७ जून २०२२ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे'. असे लिहिले आहे. यावरून पुढच्या वर्षी 'डॉक्टर जी' येत असल्याची माहिती मिळत आहे.

'बरेली की बर्फी' (२०१७) आणि 'बधाई हो' (२०१८ ) या दोन सुपरहिट चित्रपटानंतर आयुष्मान बॉक्स ऑफिसवर हॅटट्रिक करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाला आहे.

जंगली पिक्चर्सच्या अमृता पांडे म्हणाल्या की, 'चित्रपटाचे लेखक सुमित, सौरभ आणि विशाल यांनी अनुभूतीसह 'डॉक्टर जी' ची एक अप्रतिम स्क्रिप्ट तयार केली असून अनुभूतीने ती पुढच्या स्तरावर नेली आहे. पुढच्या वर्षी १७ जूनला ती चित्रपटगृहात आणण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.'

चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करणारी अनुभूती कश्यप अमुभवाबद्दल सांगितले आहे की, 'चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर, आम्ही आता चित्रपटगृहांमध्ये येण्यासाठी सज्ज झालो आहोत. आयुष्मान, रकुल, शेफाली, जंगली आणि माझ्या पाठीशी उभे राहिलेल्या 'डॉक्टर जी' च्या संपूर्ण टीमसोबत काम करण्याची संधी मिळाल्याने मला खूप आनंद झाला आहे. पडद्यावर एक समृद्ध करणारा अनुभव पाहाता येणार आहे. हा चित्रपट प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.'

अनुभूती कश्यप दिग्दर्शित 'डॉक्टर जी' हा कॅम्पस कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे. डॉक्टर जी' चित्रपटाचे सहलेखन अनुभूती कश्यपसह, सुमित सक्सेना, विशाल वाघ आणि सौरभ भारत यांनी केले आहे.

हेही वाचलंत का? 

(photo : jungleepictures instagram वरून साभार)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news