Kangana Ranaut vs Javed Akhtar | कंगना प्रकरणी जावेद अख्तर अडचणीत, सत्र न्यायालयात घेतली धाव

Kangana Ranaut vs Javed Akhtar | कंगना प्रकरणी जावेद अख्तर अडचणीत, सत्र न्यायालयात घेतली धाव
Published on
Updated on

मुंबई, पुढारी ऑनलाईन : बॉलिवूडमधील गीतकार जावेद अख्तर (Bollywood lyricist Javed Akhtar)  यांनी अंधेरी न्यायालयाने बजावलेल्या समन्स विरोधात सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. यावर ८ ऑगस्ट रोजी सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. अभिनेत्री कंगना रनौत हिने दाखल केलेल्या तक्रारीवर जावेद अख्तर यांना समन्स बजावण्यात आले होते. धमकी देणे आणि आयपीसी अंतर्गत एका महिलेच्या विनयशीलतेचा अपमान केल्याचा आरोप तिने केला आहे. त्यांना ५ ऑगस्टला अंधेरी न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. (Kangana Ranaut vs Javed Akhtar)

न्यायदंडाधिकाऱ्यांनी निष्कर्षापर्यंत पोहोचण्यास घाई केली. ही न्यायाच्या बाबतीत गंभीब बाब असल्याचे अख्तर यांनी वकील जय भारद्वाज यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. कंगनाच्या तक्रारीनुसार, अभिनेता हृतिक रोशन याच्याशी असलेला वाद मिटवण्यासाठी अख्तर यांनी तिला २०२० मध्ये बोलावले होते. या भेटीदरम्यान, कंगनाने आरोप केला की जेव्हा तिने हृतिकची माफी मागण्यास नकार दिला तेव्हा जावेद अख्तर यांनी तिला धमकावले आणि अपमान केला.

या प्रकरणी कंगनाने अख्तर यांच्याविरुद्ध गुन्हेगारी कट रचणे, खंडणी मागणे आणि तिच्या गोपनीयतेवर आक्रमण करून तिच्या नम्रतेचा अपमान केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. ६ जुलै रोजी कंगनाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने २४ जुलै रोजी तिच्या तक्रारीची दखल घेतली.

या आदेशात न्यायदंडाधिकाऱ्यांनी असे निरीक्षण नोंदवले की खंडणीचे आरोप करण्यात आले असले तरी अख्तर यांच्यावर खंडणी प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

दरम्यान, अंधेरी येथील मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट आरएम शेख यांनी अख्तर यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) कलम ५०६ (धमकी देणे) आणि ५०९ (महिलेच्या विनयशीलतेचा अपमान) अंतर्गत गुन्ह्यांसाठी प्रक्रिया जारी केली आणि अख्तर यांना ५ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले. या आदेशाला अख्तर यांनी दिंडोशी, मुंबई येथील सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news