“हिरा फेरी” चित्रपटाचा ट्रेलर सोहळा संपन्न | पुढारी

“हिरा फेरी” चित्रपटाचा ट्रेलर सोहळा संपन्न

पुढारी ऑनलाईन डेस्क : “हिरा फेरी” हा भन्नाट विनोदी चित्रपट १४ ऑगस्ट २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजीटल प्रिमियर होणाऱ्या “हिरा फेरी” या चित्रपटाच्या ट्रेलर आणि संगीत प्रदर्शनाचा शानदार सोहळा पार पडला. चित्रपटाचे दिग्दर्शक अमोल बिडकर आणि कलाकार अभिनय सावंत, प्रवीण प्रभाकर तसेच चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक काशी रिचार्ड आणि गायक अरुण देव यादव, मनाली चतुर्वेदी, लव पोद्दार उपस्थित होते.

हिरा फेरी
हिरा फेरी

“हिरा फेरी” चित्रपटाचा ट्रेलर एकदम दिमाखदार आहे. चित्रपटात रातोरात श्रीमंत होऊ इच्छिणाऱ्या आळशी घरजावई विक्कीने, म्हणजेच निर्मिती सावंत यांचे सुपुत्र अभिनय सावंतने, आपली बायको अनूसोबत एका चोराला आपल्या जाळ्यात अडकवून, त्याचा बहुमोल हिरा हडपण्याच्या प्रयत्नांत असताना, तिथे बायकोचा बाप, चोराचा बॉस, मांत्रिक, पत्रकार आणि पोलिसांचा मिलाप होऊन त्या हिऱ्यासाठी घोडदौड सुरू होते आणि हिरा फेरीत हिरा कोणाकडे फिरेल हा प्रश्नचिन्ह उभा राहतो. नेमका हिरा कोणाकडे जाईल याची धम्माल विनोदी मजा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Back to top button