Kajol : पापाराझी कल्चर आणि काजोल…

KAJOL
KAJOL

पुढारी ऑनलाईन : बॉलीवूड इंडस्ट्रीत पापाराझी कल्चर कसे फोफावत चालले आहे, याचा अलीकडेच काजोलने ( Kajol ) एका मुलाखतीत सविस्तर लेखाजोखा मांडला. छायाचित्रकारांनी कॅमेरा क्लिक करून विविध पोझमधील फोटो घेणे हे मला एक सेलिब्रिटी या नात्याने कळते. पण, कलाकारांचा प्रत्येक ठिकाणी पाठलाग करू नये, अशी अपेक्षा तिने याप्रसंगी मांडली.

एकदा तर आपण बाहेर पडताच एका पापाराझीने आपल्या कारचा कसा पाठलाग केला होता, हे तिने यावेळी जाहीर केले. वास्तविक पापाराझीमध्ये काजोलबाबत ( Kajol ) बरेच आकर्षण आहे आणि ते साहजिकही आहे. काजोलची कन्या न्यासा हिची छायाचित्रेही सोशल मीडियावर सातत्याने झळकत असतात. न्यासा ज्या पद्धतीने माध्यमांना हाताळते, त्याची काजोलने प्रशंसा देखील केली आहे. मात्र, पापाराझीकडून अतिरेक होत असल्याचा काजोलचा दावा आहे आणि यासाठी तिने अलीकडेच आपल्याला आलेल्या अनुभवाचा दाखला दिला.

ती म्हणाली, मी त्यावेळी बांद्रा परिसरातून जात होते आणि त्याच वेळी माझी कार कोणी तरी पाहिली असेल. त्यांनी माझा पाठलाग सुरू केला. मी त्यावेळी ना चित्रीकरणाला जात होते, ना कोणत्याही इव्हेंटला. कोणते हॉटेल किंवा रेस्टॉरंट, येथेही जात नव्हते. तरीही पाठलाग केला जातो, हे मला धक्का देणारे होते.

आता पापाराझी कल्चरबद्दल केवळ काजोलच नव्हे तर तापसी पन्नूपासून जया बच्चन यांच्यापर्यंत अनेक कलाकारांनी यापूर्वी आपली नाराजी जाहीरपणे मांडली आहे. आलिया भट्ट व अनुष्का शर्मा यांनी तर एकदा घरी असताना छायाचित्रे घेणाच्या काही माध्यमांवर तीव्र नाराजी दर्शवली होती.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news