Jawan Hindi Prevue : शाहरुख खानच्या ‘जवान’चा दमदार प्रिव्ह्यू रिलीज (Watch Video) | पुढारी

Jawan Hindi Prevue : शाहरुख खानच्या 'जवान'चा दमदार प्रिव्ह्यू रिलीज (Watch Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘पठान’च्या तुफान यशानंतर शाहरुखच्या जवान चित्रपटाचा दमदार प्रिव्ह्यू रिलीज झालाय. (Jawan Hindi Prevue) हिंदी ट्रेंडिंग चित्रपट जवानमध्ये शाहरुख जवान दमदार ॲक्शनमध्ये दिसतोय. ॲटलीने हा चित्रपट दिग्दर्शित केला असून गौरी खानची निर्मिती आहे. (Jawan Hindi Prevue)

प्रिव्ह्यूमध्ये शाहरुख खान एका सीनमध्ये आपल्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर पट्टी खोलताना दिसतोय. जेव्हा त्याचा बाल्ड लूक समोर येतो, तेव्हा तो खूप खतरनाक दिसतो. ‘जवान’ मधील शाहरुख खानची भूमिका अंगावर शहारे आणणारी असेल.

याआधी चित्रपटाच्या पोस्टर्सने धुमाकूळ घातला होता. शाहरुख पूर्णपणे बँडेज आणि पट्ट्यांध्ये बांधलेला दिसला. Jawan में Shah Rukh Khan मध्ये दमदार डायलॉग बोलताना दिसतोय. शाहरुखचा एक डायलॉग आहे, ‘जब मैं विलेन बनता हूं ना, तो मेरे सामने कोई हीरो टिक नहीं पाता है’.

चित्रपटात Deepika Padukone चे स्पेशल अपीयरेंस आहे. ‘जवान’च्या प्रीव्ह्यूमध्ये लाल साडीत ॲक्शन करताना दिसतेय. तर Nayanthara पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे.

७ सप्टेंबर रोजी रिलीज होणार ‘जवान’

‘जवान’मध्ये शाहरुख खानची दुहेरी भूमिका आहे. नयनतारा, प्रियामणि, सुनील ग्रोवर आणि विजय सेतुपतिदेखील दिसत आहेत. जवळपास २२० कोटी बजेटमध्ये हा चित्रपट तयार झालाय. परंतु, अन्य भाषांमध्ये भारतात रिलीज होईल. ‘जवान’ ७ सप्टेंबर रोजी थिएटर्समध्ये रिलीज होईल. सान्या मल्होत्रा, रिद्धी डोगरा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटामध्ये दीपिकाशिवाय संजय दत्तचाही कॅमियो असेल.

 

Back to top button