Mohammad Zakir Hussain
Mohammad Zakir Hussain

Mohammad Zakir Hussain : व्हॉईस ऑफ इंडिया फेम मोहम्‍मद जाकिर हुसैन यांचे निधन

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : व्हॉईस ऑफ इंडिया फेम मोहम्‍मद जाकिर हुसैन यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. (Mohammad Zakir Hussain) त्यांची तब्येत अचानक बिघडली होती. गायक जाकिर हुसैन यांनी बिलासपूरमध्ये अखेरचा श्वास घेतला. मोहम्‍मद जाकिर हुसैन य़ांच्या आकस्मिक निधनाने संगीत जगतात शोककळा पसरली आहे.  (Mohammad Zakir Hussain)

माहितीनुसार, आपल्या सुरेल आवाजाची जादू चालवणाऱ्या मोहम्‍मद जाकिर हुसैन आपल्या परिवारासोबत बिलासपूर येथे गेले होते. तेथे त्यांची तब्येत अचानक बिघडली.

मीडिया रिपोर्टनुसार, त्यांना हार्ट ॲटॅक आला होता. निधनाची बातमी समजताच पुरानी बस्‍ती, वार्ड-४, रानी रोड धनवार पारा, छत्तीसगढ येथील त्यांच्या आवासस्थानी नातेवाईक आणि शुभचिंतकांनी गर्दी करायला सुरुवात केली. त्यांचे पार्थिव मंगळवारी रात्री उशीरा बिलासपूरहून कोरबा येथे आणण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news