Adipurush Movie : आदिपुरुषवरून नेपाळमध्ये वाद, काठमांडूमध्ये भारतीय चित्रपटांवर बंदी | पुढारी

Adipurush Movie : आदिपुरुषवरून नेपाळमध्ये वाद, काठमांडूमध्ये भारतीय चित्रपटांवर बंदी

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतात चित्रपट आदिपुरुषवरील वादानंतर आता नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये चित्रपटावर बंदी घालण्यात आलीय. काठमांडूचे महापौर बालेन शाह यांनी सर्व भारतीय चित्रपटांच्या प्रदर्शनावर बॅन लावले आहे. (Adipurush Movie ) बालेन शाह यांनी चित्रपट आदिपुरुषमधील एका संवादावर आक्षेप व्यक्त केलाय. जर संवाद बदलले गेले नाही तर हा चित्रपट नेपाळमध्ये रिलीज करण्याची परवानगी मिळणार नाही, असे त्यांनी म्हटलंय. एका इंग्रजी रिपोर्टनुसार, नेपाळमध्ये या चित्रपटाच्या संवादावर आक्षेप घेत सर्व हिंदी चित्रपटांवर बंदी घालण्यात आली आहे.  (Adipurush Movie )

चित्रपटात माता सीतेच्या एका दृश्यावरून नेपाळच्या लोकांमध्ये रोष आहे. बालेन शाह यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांना तीन दिवसाच्या आत संवादामध्ये सुधारणा करण्याचा इशारा दिलाय. काठमांडूमध्ये सर्व भारतीय चित्रपटांवर प्रतिबंध घालण्यात आला आहे. १८ जूनला बालेन शाह यांनी काठमांडूच्या सर्व चित्रपटगृहात आदिपुरुषची स्क्रिनिंग रोखण्याचे आदेश दिले आहेत.

बालेन शाह म्हणाले, प्रभासने भगवान राम यांची भूमिका साकारलीय. आदिपुरुषमध्ये संवादमध्ये एक ओळ आहे. ज्यामध्ये माता सीता ‘भारताची कन्या’ म्हणून वर्णित केलं गेलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिलं की, माता सीतेला नेपाळची कन्या म्हटले जाते. निर्मात्यांकडे ही ओळ बदलण्यासाठी तीन दिवसांचा वेळ आहे.

Back to top button