

पुढारी ऑनलाईन डेस्क : सा रे ग म प लिटिल चॅम्प्स फेम गायक मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. (Mugdha- Prathamesh) सारेगमप लिटल चॅम्प्सचं पहिल्या सीझनमध्ये प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन होते. दोघांनीही नुकताच आपल्या नात्याविषयी उघडपणे सांगितले आहे. आमचं ठरलंय म्हणत दोघांनी आपले नाते जाहीर केले आहे. (Mugdha- Prathamesh)
मुग्धा आणि प्रथमेश दोघेही गायक आहेत. स्पर्धक म्हणून लिटिल चॅम्पसमध्ये दोघेही सहभागी झाले होते. आता दोघेही आता मोठे झाले आहेत. सोशल मीडियावरून दोघांनीही त्यांच्या रिलेशनशीपविषयी जाहिर केले आहे. तुम्हा सर्वांना आमच्याकडून बातमी किंवा घोषणेची अपेक्षा आहे. तेच हेच आहे. शेवटी आमचं ठरलंय! अशी कॅप्शन त्यांनी लिहिलीय. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आहेत.
मुंबई विद्यापीठातून मुग्धाने एम ए (म्युझिक) विषयातून गोल्ड मेडल मिळवले आहे. अनेक कलाकारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री स्पृहा जोशीने वेलकम वहिनी अशी कमेंट केली आहे.