दिग्दर्शक शेखर कपूर "मासूम... द न्यू जनरेशन" चित्रपटाचे करणार दिग्दर्शन | पुढारी

दिग्दर्शक शेखर कपूर "मासूम... द न्यू जनरेशन" चित्रपटाचे करणार दिग्दर्शन

पुढारी ऑनलाईन डेस्क : नेहमीच वेगळ्या विषयावर चित्रपट करणारे चित्रपट निर्माते शेखर कपूर (Shekhar Kapur) हे लवकरच एका नव्या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असल्याचं समजतंय. त्यांचा नुकत्याच आलेल्या “व्हॉट्स लव्ह गॉट टू डू विथ इट” या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिलाय. आता शेखर कपूर पुन्हा नव्या जोमाने नवा चित्रपट घेऊन येणार आहेत. (Shekhar Kapur)

स्रोतानुसार, शेखर कपूर “मासूम… द न्यू जनरेशन” या चित्रपटाची स्क्रिप्ट तयार करत आहेत. हा चित्रपट कल्ट क्लासिक चित्रपट ‘मासूम’चा बहुप्रतीक्षित सिक्वेल असणार आहे. लवकरच शेखर कपूर यांची अधिकृत घोषणा करतील अशी अपेक्षा आहे. अलीकडे ते भारतात आले असताना या चित्रपटासाठी अनेक बैठका झाल्याचं देखील कळतंय!

शेखर कपूर यांनी २१ ऑक्टोबर १९८३ रोजी ” मासूम ” दिग्दर्शित केला होता. शेखर कपूरच्या “बॅन्डिट क्वीन” आणि “मिस्टर इंडिया” सारख्या इतर आयकॉनिक चित्रपटाने भारतीय चित्रपट उद्योगा एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे.

चित्रपटसृष्टीतील शेखर कपूरच्या योगदानामुळे केवळ भारतीय चित्रपसृष्टी नाही तर त्यांनी घडवलेल्या एलिझाबेथ आणि एलिझाबेथ: द गोल्डन एज ​​या चित्रपटांना ऑस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटांसह आंतरराष्ट्रीय स्तरावरही सन्मान मिळाला. सिनेमाद्वारे शोध लागण्यापूर्वी त्यांनी केट ब्लँचेट, एडी रेडमायन आणि हेथ लेजर यांसारख्या अभिनेत्यांसह काम केले होते. चित्रपसृष्टीत एक वेगळा दृष्टीकोन ठेवून काम करण्याचा त्यांचा अविरत प्रयत्न आजही तितक्याच जोमाने सुरू आहे!

 

Back to top button