अंकिता लोखंडेच्या 'पवित्र रिश्ता' मालिकेची १४ वर्ष! | पुढारी

अंकिता लोखंडेच्या 'पवित्र रिश्ता' मालिकेची १४ वर्ष!

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री अंकिता लोखंडे ही इंडस्ट्रीमधली एक प्रतिभावान आणि प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. टेलिव्हिजन शोमधील तिच्या एका खास ‘पवित्र रिश्ता’ मालिकेला आज १४ वर्षे पूर्ण होत आहे. ‘पवित्र रिश्ता’ ही मालिका छोट्या पडद्यावर प्रसारित झाली असून २००९ ते २०१४ या कालावधीत ५ वर्षे चाहत्यांचे मनोरंजन केलं आहे.

मालिकेतील भारदस्त पात्रे, उत्तम कथा यासाठी गाजली आहेत. अर्चनाच्या भूमिकेत असलेल्या अंकिताचे खूपच कौतुक झालं आहे. तिची मुख्य भूमिका असलेली ही मालिका अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर करून केली. तिच्या लीड रोलने ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा इंडियन टेलिव्हिजन अकादमी पुरस्कार’ आणि मुख्य भूमिकेतील ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा सुवर्ण पुरस्कार’ या सारखे अनेक पुरस्कार या मालिकेसाठी जिंकले. दिवंगत सुशांत सिंग राजपूतसोबतच्या तिच्या ऑन-स्क्रीन जोडीचे खूप कौतुक झाले. या मालिकेला मिळालेला प्रतिसाद अद्भुत होता.

अंकिताने ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटातून झलकारीबाईची भूमिका साकारली होती. तिच्या अलीकडील ‘फीचर फिल्म’, आणि ‘द लास्ट कॉफी’ ची प्रेक्षकांनी प्रभावी कामगिरीसाठी प्रशंसा केली. टीव्ही मालिका असो, बॉलिवूड चित्रपट असो किंवा फीचर फिल्म असो, अंकिताने प्रत्येक भूमिका उत्तम साकारली आहे.

अंकिताला प्रत्येक भूमिकेतून प्रेम मिळालं आहे. यामुळे चाहत्यांनी केलेल्या अपार प्रेमाबद्दल ती नेहमीच प्रेक्षकांचे आभार मानत असते. अंकिता रणदीप हुड्डासोबत ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ हा चित्रपट करत असून नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

हेही वाचा : 

Back to top button