‘हाऊसफुल्ल ३’ ची सात वर्ष!; अक्षय कुमार ते नर्गिस फाखरी कलाकारांची क्लासिक कॉमेडी! | पुढारी

'हाऊसफुल्ल ३' ची सात वर्ष!; अक्षय कुमार ते नर्गिस फाखरी कलाकारांची क्लासिक कॉमेडी!

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘हाऊसफुल्ल ३’ ने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत या चित्रपटाने सगळ्यांची मन जिंकली. आज या चित्रपटाला ७ वर्ष पूर्ण झाली असून चित्रपटाचा करिश्मा आज सुद्धा कायम आहे. अभिनयाची आणि खळखळून हसवणारी कॉमेडी या चित्रपटात भरभरून आहे यात शंका नाही. अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, जॅकलीन फर्नांडिस, लिसा हेडन आणि नर्गिस फाखरी यांच्या टॅलेंटने ‘हाऊसफुल ३’ हा चित्रपट विनोदाचा एक अनोखा सोहळा संपन्न होत आहे.

‘हाऊसफुल्ल ३’ च्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त नर्गिस फाखरीने चित्रपटाचा उल्लेखनीय अविस्मरणीय प्रवास तिने तिच्या सोशल मीडिया पोस्टमधून केला आहे. या चित्रपटाच्या आठवणी हास्याचा कल्लोळ आणि बरचं काही अशा अनेक गोष्टी तिने या पोस्टमधून शेअर केल्या आहेत. ‘हाऊसफुल ३’ मध्ये नर्गिस फाखरीने सरस्वतीची व्यक्तिरेखा साकारली होती, जी एका प्रेमाच्या त्रिकोणात अडकलेली मुलगी होती. तिच्या अभिनय शैलीने या चित्रपटात प्रेक्षकांची मने जिंकली.

‘आम्ही ‘हाऊसफुल ३’ ची आनंदी सात वर्ष साजरी करत असून जगभरातील प्रेक्षकांनी या चित्रपटाला जे प्रेम दिलं त्याबद्दल खूप धन्यवाद’ असे नर्गिस फाखरी म्हणाली.

हेही वाचा : 

Back to top button