Kon Honar Crorepati : आज उलगडणार सचिन पिळगावकर-श्रिया यांचे अनोखे नाते

sachin pilgaonkar and shriya
sachin pilgaonkar and shriya
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'कोण होणार करोडपती'मध्ये शनिवार ३ जूनच्या 'विशेष भागात' सचिन पिळगांवकर आणि श्रिया पिळगांवकर हॉट सीटवर येणार आहेत. दीपस्तंभ फाउंडेशन या संस्थेसाठी सचिन पिळगांवकर आणि श्रिया पिळगांवकर 'कोण होणार करोडपती'चा (Kon Honar Crorepati ) खेळ खेळणार आहेत. या पर्वातील हा पहिला विशेष भाग असणार आहे आणि या भागात सचिन पिळगांवकर आणि श्रिया पिळगावकर यांच्याशी गप्पा रंगणार आहेत. या बाप-लेकीबरोबर रंगणाऱ्या गप्पा आणि किस्से पाहणे हे प्रेक्षकांसाठी खास असणार आहे. त्याशिवाय 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर दोन सचिन एकत्र असतील. तेही नक्कीच गंमतीदार असेल. (Kon Honar Crorepati )

चित्रपटसृष्टीत तब्बल ६० वर्षे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते सचिन पिळगावकर 'कोण होणार करोडपती'चा खेळ खेळणार आहेत. सचिन पिळगावकर हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत प्रचंड लोकप्रिय अभिनेते. त्यांनी त्यांच्या अभिनयाचे ठसे त्यांच्या बालपणापासूनच उमटवले आहेत. तसेच श्रिया सुद्धा मराठी सोबतच हिंदी सिनेसृष्टीत नावलौकिक आघाडीची अभिनेत्री आहे. चित्रपटांसोबतच काही गाजलेल्या वेब मालिकांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आजवर आली.

श्रियाकडून आपल्या बाबांविषयीचे काही गमतीदार किस्से प्रेक्षकांना पाहायला/ऐकायला मिळणार आहेत. सचिन खेडेकर यांच्याशी बोलताना अनेक गोष्टी उलगडल्या जाणार आहेत. सचिन पिळगावकर म्हणले की, त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी वकिलाची भूमिका कधीच केली नाही. पण श्रियाने तिच्या कारकिर्दीची सुरुवात ही वकिलाच्या भूमिकेपासूनच केली. सचिन पिळगावकर मंचावर आहेत आणि गाणे सादर होणार नाही, हे शक्य नाही. 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर त्यांनी श्रियाबरोबर गाणेही सादर केले आणि 'कोण होणार करोडपती'चा मंच काही काळासाठी संगीतमय झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news