Al Pacino 83 वर्षाच्या ‘गॉडफादर’ अभिनेत्याची 29 वर्षीय प्रेयसी प्रेग्नंट, चौथ्यांदा होणार बाप | पुढारी

Al Pacino 83 वर्षाच्या ‘गॉडफादर’ अभिनेत्याची 29 वर्षीय प्रेयसी प्रेग्नंट, चौथ्यांदा होणार बाप

पुढारी ऑनलाईन डेस्क : हॉलिवूड सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अल पचिनो (Al Pacino) यांच्या घरी पुन्हा एकदा छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. वयाच्या 83 व्या वर्षी हा अभिनेता चौथ्यांदा वडील होणार असून त्यांची गर्लफ्रेंड आणि चित्रपट निर्माती नूर अलफल्लाह (Noor Alfallah) ही प्रेग्नंट असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत अभिनेत्याच्या मॅनेजरने खुलासा केला असून पचिनो यांच्या प्रेयसीची प्रसूती अवघ्या एक महिन्यानंतर होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

29 वर्षीय नूर अलफल्लाह एप्रिल 2022 पासून अभिनेता अल पचिनो यांना डेट करत आहे. दोघांची प्रेमकहाणी एका डिनर पार्टीदरम्यान सुरू झाली. त्यावेळी दोघेही एका आर्ट गॅलरीच्या उद्घाटनात एकत्र दिसले होते. अल पचिनोच्या आधीही नूरचे हाय प्रोफाइल बॉयफ्रेंड होते. ती अमेरिकन-कुवेत वंशाच्या श्रीमंत कुटुंबातील आहे.

Back to top button