Adipurush : क्रितीची सीता गुंफा येथे भेट; ‘राम सिया राम’ गाण्यावर आरती

Adipurush
Adipurush

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ स्टार प्रभास आणि बॉलिवूड अभिनेत्री यांच्या आगामी 'आदीपुरूष' ( Adipurush ) चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. एकिकडे चित्रपटातील धमाकेदार ट्रेलर आणि गाणी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. जसजसे चित्रपटाची रिलीज डेट जवळ येत आहे तसतसे सर्वच कलाकार त्याच्या प्रमोशनमध्ये गुंतले आहे. या चित्रपटातील 'राम सिया राम' हे गाणे रिलीज झाले. यानंतर क्रिती सेनॉनच्या तिच्या चित्रपटाला यश मिळवण्यासाठी नाशिकच्या सीता गुंफा आणि काळाराम मंदिरात भेट देत देवांचा आशीर्वाद घेतला आहे.

'आदीपुरूष' ( Adipurush ) चित्रपटातील 'राम सिया राम' हे धमाकेदार गाणे रिलीज झाल्यानंतर लगेचच अभिनेत्री क्रिती सेनॉन पंचवटीतील पवित्र भूमी मानल्या जाणाऱ्या नाशिकच्या प्रसिद्ध मंदिराना भेट दिल्या. यावेळी क्रिती व्हाईट- गुलाबी रंगाच्या सलवार आणि कुर्त्यात असून तिने माता सीतेचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. तसेच क्रितीने 'राम सिया राम' गाण्यावर देवाची आरतीही केली आहे. आरती करतानाचे हे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले आहेत. यावेळी क्रिती एकटी नसून चित्रपटातील अनेक कलाकार तिच्यासोबत दिसत आहेत.

हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव करत कॉमेन्टस केल्या आहेत. या व्हिडिओ काही चाहत्याच्या पसंतीस उतरला आहे. तर काही नेटकऱ्यांना तो अजिबात आवडलेला नाही. 'ढोंगी', 'चित्रपटासाठी काहीही करू लागले', 'चित्रपट रिलीज होताना हे लोक पूजा करू लागतात' अशा अनेक कॉमेन्टस केल्या आहेत.

'आदिपुरुष' हा चित्रपट १६ जून २०२३ रोजी रिलीज होणार आहे. ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटात प्रभास भगवान रामाच्या भूमिकेत तर क्रिती सेनॉन सीतेची भूमिका साकारत आहे. तर बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news