‘द केरला स्‍टोरी’वर कमल हसन म्‍हणाले, ‘सत्‍यकथा’ हा एक शब्‍द… | पुढारी

'द केरला स्‍टोरी'वर कमल हसन म्‍हणाले, 'सत्‍यकथा' हा एक शब्‍द...

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मी नेहमीच चुकीचा प्रचार करणार्‍या चित्रपटांविरोधात राहिलो आहे. तुम्‍ही केवळ ‘सत्‍यकथा’ हा एक शब्‍द लिहणे पुरेसे ठरत नाही. सत्‍य कथा म्‍हणजे ते खरेच असले पाहिजे; पण ते खरे नाही, अशा शब्‍दात ज्‍येष्‍ठ अभिनेते कमल हसन बहुचर्चित द केरला स्‍टोरी चित्रपटावर आज (दि.२७) आपलं मत व्‍यक्‍त केले.

दक्षिण भारतातील कलाकार मुद्द्यांवर भूमिका घेतात पण बॉलीवूडमधील कलाकार असे करताना दिसत नहाी, यावर कमल हसन म्‍हणाले, याकडे मला तुच्छतेने पाहण्याची किंवा त्यावर भाष्य करण्याची गरज नाही. देश अधिक महत्त्वाचा आहे. शांतता अबाधित ठेवून आपली कला सादर करणे अधिक महत्त्‍वाचे आहे, असेही त्‍यांनी सांगितले.

 

 

Back to top button