आईच्या मातृत्वाची कथा ‘जननी’चा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर | पुढारी

आईच्या मातृत्वाची कथा ‘जननी’चा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर

पुढारी ऑनलाईन : ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर बहुचर्चित ‘जननी’ हा चित्रपट २९ मे २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. नुकतेच मातृदिनाचे औचित्य साधून चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले आहे.

जननी या चित्रपटाची कथा विचार प्रवर्तक आणि भावनिकरित्या मातृत्वाच्या नातेसंबंध, कौटुंबिक बंध आणि वैयक्तित वाढ यांच्या गुंतागुंतीचे वर्णन करून मांडण्यात आली आहे. आईच्या आपल्या मुलांवरील प्रेमाचा आणि आपल्या मुलांच्या सुखासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणाऱ्या ‘जननी’ या चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन, मोहनीश बहल, आयेशा झुल्का, अमन वर्मा, विनीत रैना आणि सोनिका हंडा या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

या चित्रपटाच दिग्दर्शन चंदर एच. बहल यांनी केलं आहे, तर अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आता हा चित्रपट अल्ट्रा झकास या मराठमोळ्या ओटीटीवर पाहता येणार आहे.

हेही वाचा : 

Back to top button