Aditya Singh Rajput case : आदित्य सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी पोलिसांनी नोंदवला तिघांचा जबाब

आदित्य सिंग राजपूत
आदित्य सिंग राजपूत
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता आदित्य सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाचा ओशिवरा पोलिसांकडून तपास सुरू आहे. (Aditya Singh Rajput case ) ओशिवरा पोलिसांनी त्याचा घरातील नोकर, खासगी डॉक्टर आणि वॉचमन या तीन लोकांचे जबाब नोंदवले आहेत. त्याची आई दिल्लीहून मुंबईला निघाली आहे. आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्यांचे शवविच्छेदन करण्यात येणार असून कुटुंबीयांच्या संमतीनंतर आज अंत्यसंस्कार केले जातील, असे मुंबई पोलिसांनी माहिती दिल्याचे एका वृत्तसंस्थेने म्हटले आहे. (Aditya Singh Rajput case )

स्प्लिट्सव्हिला फेम टिव्ही स्टार आदित्य सिंह राजपूत याचा वयाच्या ३२ व्या वर्षी मृत्यू झाला. त्याच्या अंधेरीतील घरातील बाथरुममध्ये तो पडलेल्या अवस्थेत आढळला. त्याच्या मित्राने व वॉचमनने रुग्णालयात हलवले मात्र डॉक्टरांनी त्याला मृतघोषित केले. ड्रग्जच्या ओव्हर डोसमुळे हा मृत्यू झाल्याची माहिती पुढे येत आहे. टिव्ही स्टार व कास्टींग डायरेक्टर म्हणून आदित्य सिंह चित्रपट सृष्टीत सुपरिचित होता.

मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी त्याच्या राहत्या फ्लॅटमध्ये तो मृतावस्थेत आढळला. त्याच्या मित्राला तो बाथरुममध्ये पडलेल्या अवस्थेत आढळला. बिल्डिंगच्या वॉचमनच्या सहाय्याने मित्राने आदित्यला रुग्णालायात दाखल केले. पण, त्याचा आधीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

आदित्यचे कुटुंब दिल्लीत वास्तव्यास आहे तर आदित्य अंधेरीतील लोखंडवाला परिसरातील लश्करिया हाईटस् या अपार्टमेंटमध्ये अकराव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये राहत होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news